विधानसभेच्या १५ ते १७ जागा लढवणार
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- विधानसभा निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाने(भाकप) राज्यात १५ ते १७ जागा लढविण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठीच्या मोर्चेबांधणीसाठी नाशिकमध्ये राज्यस्तरीय कार्यकारिणी व राज्य कौन्सिलची बैठक झाली. बैठकीत , भंडारा विधानसभेच्या जागेवर भाकपने दावा केला अशी माहीती भाकप भंडारा जिल्हा कौन्सिल, तर्फे कॉम्रेड हिवराज उके जिल्हा सचिव यांनी दिली आहे.
नाशिक येथील भाकप राज्य कौन्सिल मधील निर्णयाची माहिती एका पत्र परिषदेत राष्ट्रीय सचिव डॉ.भालचंद्र कानगो, सचिव ऍड. सुभाष लांडे, सहसचिव डॉ. राम बाहेती, राष्ट्रीय कौन्सिल सदस्य कॉम्रेड शिवकुमार गणवीर, राजू देसले, स्मिता पानसरे, नामदेव चव्हाण, राजन क्षीरसागर इत्यादी बैठकीला उपस्थित होते. 'जातीय ध्रुवीकरणाच्या वातावरणात पाणी, वीज, रेशन, वेतन, शिक्षण, आरोग्य हे जनतेचे मूलभूत प्रश्न मागे पडले आहेत. याकडे दुर्लक्ष करून केंद्र सरकार श्रीमंतांना मदत व गरिबांची लूट करीत आहे. केंद्राने मांडलेला अर्थसंकल्प हा भांडवलदारधार्जिणा आहे अशी टीका डॉ . कानगो यांनी केली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची यंदा १५०वी जयंती साजरी होत आहे. त्यामुळे जातनिहाय जनगणनेच्या समर्थनासह आरक्षणावरील पन्नास टक्के मर्यादा उठविण्याच्या मागणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात परिषद घेण्यात येईल. कोल्हापूरमध्ये राज्यव्यापी जातनिहाय जनगणना परिषद घेणार आहे असे डॉ. कानगो यांनी स्पष्ट केले. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील मतदारसंघांचा आढावा घेत उमेदवारांची यादी तयार झाली असून प्रचाराची दिशा ठरविण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले.
आगामी आंदोलने
१६ ते २९ ऑगस्ट दरम्यान जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर राज्यव्यापी मोहीम राबविण्यात येईल. ३० ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोर्चा किंवा धरणे आंदोलन केले जाईल. असेही डॉक्टर कॉम्रेड भालचंद्र कांगो यांनी सांगितले. नाशिक येथील राज्य कौंसिल सभेत भंडारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व भाकपचे राष्ट्रीय कौंसिल सदस्य कॉम्रेड शिवकुमार गणवीर, कॉम्रेड माधवराव बांते व कॉम्रेड हिवराज उके यांनी केले.


0 टिप्पण्या