Ticker

6/recent/ticker-posts

वंचितच्या आंदोलनासमोर सरपंच नमले.

संजय देशमुख चित्रा न्युज
व्याळा : व्याळा ग्रामपंचायत स्थापनेपासून ग्रामविकास करिता व्याळा ग्रामपंचायत समोर आंदोलन करण्याची वेळ आलेली नाही. मात्र सरपंच गजानन वझीरे यांच्या दुर्लक्षित पणामुळे आणि त्यांच्या पत्नी वर्षाताई गजानन वझीरे जिल्हा परिषद सदस्य असून सुद्धा व्याळा गावात रस्त्यावरून चालणे कठीण झाले तसेच अंधाराचे साम्राज्य पसरले या सर्व बाबी व समस्या दूर करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी व्या च्यावतीने 13 ऑगस्ट रोजी गावातल्या समस्या दूर करण्यासाठी व अपंगांचा 5% टक्के निधी वाटण्या करिता  व्याळा ग्रामपंचायत समोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले होते.

सरपंच गजानन वझीरे यांनी ग्रामस्थांच्या मागणीकडे पाठ फिरवल्याने आणि आंदोलकाचे निवेदन न स्वीकारल्याने आंदोलक आक्रमक झाले व गावातील समस्या दूर करण्यासाठी म्हणून वंचित बहुजन आघाडीचे गजानन दांडगे व संदीप दामोदर यांनी 31 ऑगस्ट ला पाच दिवस अन्नत्याग व 15 सप्टेंबर रोजी ला ग्रामपंचायत समोर मोर्चा काढून आत्मदहनाचा इशारा दिला होता या संदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा परिषद अकोला, तहसीलदार, बीडिओ, ठाणेदार यांना लिखित स्वरूपात निवेदन देण्यात आले होते.  तसेच वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, गुलाबराव उमाळे, संजय उमाळे या वंचित बहुजन पदाधिकारी यांना सुद्धा माहिती देण्यात आली होती.

 हे सर्व पाहून 22 ऑगस्ट रोजी तहकूब ग्रामसभेमध्ये व्याळा ग्रामस्थांचे निवेदन घेऊन ग्रामपंचायत कार्यालय व्याळा मध्ये आंदोलन गजानन दांडगे, गौतम वानखडे, विलास वानखडे, संदीप दामोदर, सविताताई वानखडे, स्वप्निल वानखडे, संघपाल वानखडे, सुरेंद्र दामोदर, विशाल गवई, राहुल वानखडे, संतोष वानखडे, शेख अश्फाक शेख, अलीम भाई, सुरेंद्र डाबेराव यांच्यासह ग्रामस्थ चर्चा करून काही समस्या त्वरित निकाली काढण्याचा निर्णय घेऊन उर्वरित समस्या येत्या एक महिन्यात किंवा 2 ऑक्टोबर 2024 च्या ग्रामसभेच्या अगोदर पूर्ण करण्याचे लिखित आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलकांनी सद्यस्थितीत आंदोलन हे स्थगित केलेले आहे.

हे ग्रामस्थांची एकीकरण व वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाचे यश आहे भविष्यात कोणतेही सरपंच हे ग्रामविकासाच्या समस्या कडे दुर्लक्ष करणार नाही याकडेही ग्रामस्थांनी जागरूकपणे लक्ष देणे गरजेचे आहे. कोणी ग्राम विकास करीत नसेल तर विरोधक म्हणून समोर येणे गरजेचे आहे. ग्रामस्थांचा व वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा धसका घेऊन व्याळा ग्रामपंचायत सरपंच गजानन वझीरे हे नमले आहेत. जर एक महिन्यात ह्या समस्या मार्गी  न लावल्यास पुन्हा वंचित बहुजन आघाडी हे लोकशाही पद्धतीने आंदोलन करणार असे प्रतिपादन गजानन दांडगे व संदीप दामोदर यांनी केले आहे.

#PrabuddhBharat

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या