मिलिंद गायकवाड चित्रा न्यूज
धाराशिव: - लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडी नव्या जोमाने पुन्हा एकदा विधानसभेसाठी जोरदार तयारी करत असल्याचे चित्र संपूर्ण राज्यभरामध्ये दिसत आहे. आगामी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेसाठी योग्य उमेदवारची चाचपणी करण्यासाठी आज शासकीय विश्रामगृह उमरगा येथे तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे धाराशिव जिल्हाध्यक्ष मा.बी.डी शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष मा.सचिन माने मा. विकास बनसोडे, मा.अरुण गरड, जिल्हा युवा प्रवक्ते मा. गोविंद भंडारे, मा. राहुल पोरे, मा.नासिर शेख, आधी जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष बि.डी शिंदे म्हणाले की आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या बहुजनांना सत्तेमध्ये आणण्याच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी तळमळीने आणि निष्ठेने काम करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने काम करावे आणि वंचित बहुजन आघाडीचे सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करावे. उमरगा विधानसभा मतदार संघ हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असून या भागामध्ये सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या तसेच समाजाचे हित जोपासणाऱ्या योग्य उमेदवाराला संधी देण्यात येणार असून. विधानसभा निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराने पक्षाकडे व जिल्हा कार्यकारणीकडे रीतसर अर्ज करावा असे अहवान जिल्हाध्यक्ष बीड शिंदे यांनी केले. यावेळी उमरगा तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या