Ticker

6/recent/ticker-posts

.💐 || सुमंगल सुप्रभात || 💐‌ 🌞 दिन विशेष 🌞

💐  || सुमंगल सुप्रभात ||  💐
‌          🌞 दिन विशेष  🌞

‌इसवी सन २०२४ -  २६ ऑगस्ट 
‌शालिवाहन शक १९४६, विक्रम संवत २०८०
‌भा. रा. ५ भाद्रपद १९४६
युगाब्द ५१२६       
संवत्सर नाम : क्रोधी
अयन : दक्षिणायण 
ऋतू : वर्षा
मास: श्रावण
पक्ष: कृष्ण   
तिथी: अष्टमी (२६.२०) ~ अष्टमी               
वार:   सोमवार
नक्षत्र: कृत्तिका (१५.५५) ~ रोहिणी       
राशी:   वृषभ 

*शिव पूजन*
*श्रावणी सोमवार, शिवामूठ : जव*
*कालाष्टमी*
*कृष्ण जन्माष्टमी* (उपवास)
*श्रीकृष्ण जयंती*  (जयंती योग)
*संत ज्ञानेश्वर जयंती*
*पू. गुलाबबाबा यात्रा,* काटेल, बुलडाणा.
*श्री योगानंद महाराज जयंती,* गुंज, परभणी.
*पंत बाळेकुद्री महाराज जयंती,* बेळगावी

१३०३: अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडगड जिंकले.
१४९८: मायकेल अँजेलो याने ’पिएटा’ या जगप्रसिद्ध शिल्पकृतीच्या कामास सुरूवात केली.
१७६८: कॅप्टन जेम्स कूक एच. एम. एस. एन्डेव्हर या जहाजातुन आपल्या पहिल्या सफरीवर निघाला.
१७९१: जॉन फिच यांना स्टीमबोट साठी अमेरिकेचे पेटंट देण्यात आले.
१८८३: इंडोनेशिया बेटावरील क्राकाटाऊ ज्वालामुखीच्या उद्रेकात १३६ गावे उध्वस्त ३६,००० लोकांचा बळी.
२००८: भारतीय तेलगु चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी यांनी प्रजा राज्यम पक्षाची स्थापना करून तिरुपती येथे पहिली सभा घेतली.

जन्मदिवस
१७४०: हॉट एअर बलून चे शोधक जोसेफ-मायकेल मॉन्टगॉल्फ़र
१९१०: मदर तेरेसा, ख्रिश्चन मिशनरी व धर्म प्रसारक, 'नोबेल पारितोषिक' आणि 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित
१९२२: गणेश प्रभाकर तथा ग. प्र. प्रधान – समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, राजकारणी, लेखक, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती. त्यांची ’स्वातंत्र्य संग्रामाचे महाभारत’, ’लोकमान्य टिळक’, हाजी पीर’, ’सोनार बांगला’, ’भाकरी आणि स्वातंत्र्य’ इ. मराठीतील पुस्तके प्रसिद्ध आहेत.
१९२७: भारतीय स्वातंत्र्य सैनिक, कॉंग्रेस नेते व हरियाणा राज्याचे माजी मुख्यमंत्री बंसीलाल.
१९२८: ओम प्रकाश मुंजाळ, हिरो सायकलचे सहसंस्थापक 
१९४४: अनिल अवचट, लेखक सामाजिक कार्यकर्ते 
१९५६: पूर्व केंद्रीय मंत्री, खासदार व 
पूर्व पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे दिवंगत पुत्र संजय गांधी यांच्या पत्नी मेनका गांधी. 

मृत्यूदिन
१९३४: प्रसिद्ध बंगाली संगीतकार, गीतकार आणि गायक, तसंच, महान कायदेपंडित, परोपकारी, समाजसेवक, शिक्षणतज्ञ आणि साहित्यिक अतुल प्रसाद सेन. 
१९४८: कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, मराठी नाटककार, 'केसरी'चे संपादक
१९७४: पॅरिस ते न्यूयॉर्क ही ५,८०० कि.मी. विनाथांबा विमानोड्डाण स्पर्धा साडे ३३ तासात जिंकणारा धाडसी वैमानिक चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग. वैमानिकी जीवनाच्या अनुभवांवरील त्यांच्या ’द स्पिरीट ऑफ सेंट लुईस’ या पुस्तकास पुलित्झर पुरस्कार मिळाला. 
१९७५: भारतीय स्वातंत्र्यसेनानी आणि कॉंग्रेस सेवा दलाचे संस्थापक व राजकारणी डॉ. नारायण सुब्बाराव हार्दिकर.
१९९९: नरेन्द्रनाथ – डेव्हिस करंडक लॉन टेनिसपटू
२०१२: ए. के. हंगल, अभिनेता व स्वातंत्र्य सैनिक 

*।। दास-वाणी ।।* 

सकळांवडिल अंतरात्मा । 
त्यासी नेणे तो दुरात्मा । 
दुरात्मा म्हणिजे दुरी आत्मा । 
अंतरला तया  ।। 

जवळी असोन चुकले । 
प्रत्ययास नाहीं सोकलें । 
उगेचि आलें आणी गेलें । 
देवाचकरितां  ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : १५/०९/१८-१९ 

पृथ्वी आप तेज वायु आणि आकाश हे जरी एकाआधी एक जन्माला आले असले तरी सर्वात आधीपासून असतो तो ईश्वर किंवा अंतरात्मा. अंतरात्म्याला जो जाणून घेत नाही तो दुरात्मा मानावा. दुरी आत्मा म्हणजे आत्मज्ञान न झाल्यामुळे ज्याच्यापासून आत्माच दूर राहातो तो. आत्मज्ञान विना पार्थ । सर्व कर्म निरर्थकं । 

आत्मदेव जीवाच्या अंत:करणातच ठाण मांडून बसलाय. त्याचा प्रत्यय म्हणजे अनुभूती घेणे हे प्रत्येक साधकाचे कर्तव्य आहे. हे न घडल्यास पुनरपि मरणम् पुनरपि जननम् । 
जन्म मरणाचे फेरे हे ईश्वराच्या इच्छेने घडतात, परंतु माणसाचे कर्म आणि वासनाच त्याला कारणीभूत असतात. आत्मज्ञानप्राप्तीची जिज्ञासा मनामधे उत्पन्न न होता जे आयुष्य फुकट घालवतात, ते उगीच जन्माला आले, आणि उगीच मेले.

*पिंडोत्पत्तीनिरूपण समास.*

*संकलक : सुधीर देशपांडे (आबा)*

 🙏 💐💐💐💐 💐 🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या