Ticker

6/recent/ticker-posts

आरक्षण बचाव यात्रेचे वसमतनगरीत भव्य स्वागत करण्यात आले

श्रीकांत बारहाते चित्रा न्युज हिंगोली

हिंगोली :-वसमत शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आरक्षण बचाव रॅलीचे भव्य स्वागत करण्यात आले वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्रद्धेय एॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण बचाव यात्रेचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये होत असुन आज दिनांक 3 आॅगष्ट 2024 रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रथम अभिवादन करण्यात आले वसमत येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात आरक्षण बचाव यात्रेनिमित्त एॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण बचाव संबंधि या ठिकाणी मार्गदर्शन केले तसेच छत्रपती संभाजी नगर येथे होणाऱ्या मेळाव्यास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय एॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी आवाहन करण्यात आले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या