Ticker

6/recent/ticker-posts

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे धाराशिव जिल्हा सहसचिव आर एस गायकवाड यांची महाराष्ट्र पोलीस टाईम्सचे उपसंपादक पदी नियुक्ती....

मिलिंद गायकवाड चित्रा न्यूज 


धाराशिव: - अणदूर येथील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आर.एस. गायकवाड यांची महाराष्ट्र पोलीस टाईम्सचे उपसंपादक पदी नियुक्ती करण्यात आली आहे..
महाराष्ट्र पोलीस टाईम्सचे मुख्य संपादक उमेश काळे साहेब आणि झाकिर शेख धाराशिव जिल्हा प्रतिनिधी राहुल कांबळे धाराशिव तालुका प्रतिनिधी बाबा वाघमारे तुळजापूर तालुका प्रतिनिधी भुम,कळंब वाशी तालुक्यातील अनेक पत्रकार यांच्या उपस्थितीत आर.एस.गायकवाड यांना महाराष्ट्र पोलीस टाईम्सचे उपसंपादक म्हणून निवड करण्यात आली आहे.
आर एस गायकवाड हे विद्रोही विचारांचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत.अन्यायाची चिड आणि न्याय हक्कासाठी लढणारे खंबीर स्वाभिमानी स्पष्ट वक्ते म्हणून ते सुपरीचित आहेत. नामांतर लढ्यापासून सामाजिक चळवळीत त्यांचे खूप मोठे योगदान आहे अनेक लढ्यात ते अग्रेसर असतात. प्रत्येक आंदोलनात सहभागी होवून शेवटपर्यंत लढणारे स्वाभिमानी कार्यकर्ते असुन सामाजिक चरित्राचा कार्यकर्ता म्हणून ते सर्वांना आपलेसे वाटतात..
पुढे जमीन अधिकारांदोलन गायरान जमिनीच्या प्रश्नावर त्यांनी अनेक आंदोलने केली आहेत मागासवर्गीयांच्या स्मशानभूमी संदर्भात त्यांनी खूप आंदोलने करून स्मशानभूमीची जागा कायम करून दिली आहे ग्रामीण भागातील अनेक मागासवर्गीयांना गायरान जमिनीवर ताबा मिळवून दिला आहे अशा या सामाजिक कार्यकर्त्यांची महाराष्ट्र पोलीस टाइम्स उपसंपादक पदी नियुक्ती झाल्यामुळे समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या