Ticker

6/recent/ticker-posts

लाखनी येथे बदलापूर घटनेचा मविआ कडून निषेध

 नराधमाला फाशीची शिक्षा द्या या करिता मुख्यमंत्र्यांना निवेदन 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- गेल्या काही दिवसांपासून समोर आलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरुन गेला आहे. बदलापूरमध्ये दोन चिमुकलींवर झालेल्या लैंगिक शोषणाच्या घटनेवरुन राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीकडून राज्यभरात निषेध केला जात आहे. लाखनी तालुका महाविकास आघाडीच्या वतीने सिंधी लाईन चौक लाखनी येथे महाविकास आघाडीच्या प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे व हाताला काळी फीत बांधून, तोंडावर काळा मास्क लावून निषेध आंदोलन केले.
                    त्यानंतर लाखनी तालुका महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदार लाखनी यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिरात शिकणाऱ्या चार वर्षाच्या दोन मुलींवर त्याच विद्यालयातील एका नराधम कर्मचाऱ्यांने लैंगिक अत्याचार केले. त्या नराधमाला कठोर शिक्षा देण्यात यावी. अशी मागणी सदर निवेदनाव्दारे लाखनी तालुका महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे.
                       यावेळी लाखनी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष योगराज झलके, शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा संघटक प्रमुख लवकुश निर्वाण, जिल्हा महासचिव राजूभाऊ निर्वाण, सभापती प्रणालीताई सार्वे प. स. लाखनी, विद्याताई कुंभरे सदस्या जि. प. भंडारा, लाखनी तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष पुष्पाताई डुंबरे, लाखनी शहर महिला काँग्रेस अध्यक्ष कल्याणीताई भिवगडे, सुनंदाताई धनजोडे, लाखनी शहर काँग्रेस अध्यक्ष मोहन निर्वाण, लाखनी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष यशवंत खेडीकर, दिनेश गिऱ्हेपुंजे, संजय कांबळे, जयकृष्ण फेंडरकर, परसराम फेंडारकर, भोला उईके, विनोद भुते, भोजराम तलमले, स्वप्निल खंडाईत, विजय सार्वे, मंगेश धांडे, कुंदन आगाशे, अनिकेत गोस्वामी, महेश निर्वाण, अनिल बावनकुळे, गोविंद मेघराजनी, भूपेश शेंडे, दिलीप कापसे,  विजय वाघाये, नंदलाल चौधरी, मनोज ईश्वरकर, नजीर छव्वारे, लोकेश गायधनी, नितीन भालेराव, शोएब अन्सारी, परवेज आकबानी, फैजल आकबानी, हेमंत बडवाईक, विक्की अंबादे, आदी महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या