Ticker

6/recent/ticker-posts

मनोहर कनिष्ठ कला महाविद्यालयात "फ्रेशर्स डे" साजरा

 कला शाखेतील विद्यार्थ्यांनी न्युनगंढ बाळगू नये -प्रा. उमेश सिंगनजुडे 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा:- लाखनी तालुक्यातील गुरढा येथील मनोहर कनिष्ठ महाविद्यालयात फ्रेशर्स डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नव्याने प्रवेश घेतलेल्या अकरावीच्या विद्यार्थ्यांचा  बारावीच्या विद्यार्थ्यांनी पुष्पगुछ देऊन स्वागत केले.
                    फ्रेशर्स डेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य योगराज मांडवटकर, प्रमुख वक्ते प्रा. उमेश सिंगनजुडे, प्रमुख अतिथी प्रा. चंद्रकिरण साखरे व प्रा.उमेश रेहपाडे विचारपिठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात इयत्ता अकरावीच्या मुलांच्या स्वागताने झाली. प्रवेशद्वारावर प्राचार्यांनी पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांना कार्यक्र्मस्थळी आणले. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरवात झाली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत गीत व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मुलांनी गीत आणि मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा उमेश सिंगनजुडे म्हणाले कि कला शाखेत पुणे मुंबई या महानगरकडे प्रंचड स्पर्धा आहे. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय गाठण्यासाठी योग्य नियोजन करावे, कला, क्रीडा, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. स्टाफ नर्स, पोलीस, अग्निवीर, वनविभाग, रेल्वे, महसूल विभाग सैन्यदल, शिक्षक, वकील, पत्रकार, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विविध विभागात अधिकारी होण्याची संधी आहे. कला शाखेतील विद्यार्थ्यांनी न्यूनगंड न बाळगता उपलब्ध संधी शोधून प्रगतीच्या वाटा निर्माण कराव्यात असे मत व्यक्त केले. अतिथी प्रा. साखरे आणि प्रा. रेहपाडे यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्या पर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता अल्प्पोहाराने झाली. कार्यक्रमाचे संचालन स्नेहा सार्वे, प्रास्ताविक कावेरी मोहतुरे तर आभार भिवम कांबळे याने मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तृप्ती मांढरे, निकिता कान्हेकर, खुशबू वाढई, रोहित बांते, काजल शिवणकर, प्रतीक्षा धुमनखेडे, आचल शहरे यांनी विशेष सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या