भगवा सप्ताह निमित्त शिवसेना (उद्धव बालासाहेब ठाकरे) द्वारे विधानसभेमध्ये भगवा फड़कविण्याचे संकल्प
सचिन बन्सोड गोंदिया
गोंदिया : शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ४ आगस्त ते ११ आगस्त पर्यंत भगवा सप्ताह चे आयोजन करण्यात आले होते. भगवा सप्ताह या कार्यक्रमानिमित्त जिल्ह्यामध्ये अनेक कार्यक्रम राबविण्यात आले त्यात रक्तदान शिविर, वृक्षारोपण कार्यक्रम, पक्षबांधनी, कार्यकर्त्ता जनसंपर्क अभियान, बूथ जुडो, पक्षप्रवेश, शैक्षणिक साहित्य वाटपाचे कार्यक्रम असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शेवटच्या अंतिम समारोपणमध्ये 11/08/2024 रोजी जैन कुशल भवन, गोंदिया येथे मोठी सभा आयोजित करण्यात आली होती. त्यात सर्व जिल्ह्यातील शिवसैनिकांना जिला प्रमुख पंकज एस यादव यांनी संबोधित करतांना येणा-या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये भगवा फडकविण्याचे संकल्पनेतुन कामाला लागण्याचे निर्देश दिले. व अनेक पदाधिका-यांनी संबोधित केले तसेच शिवसेना परिवाराने भगवा सप्ताह निमित आयोजित केलेल्या भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे यशस्वी आयोजन संपन्न झाले.
या विशेष कार्यक्रमात अजयसिंह राजपूत (बाबा ठाकूर), नरेश माळवे, पंकज एस यादव, आणि माजी आमदार रमेश भाऊ कुथे यांची प्रमुख उपस्थिती होती. येथे झालेल्या या मेळाव्यात सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या उत्साहाने कार्यक्रमाची शोभा वाढवली.


0 टिप्पण्या