Ticker

6/recent/ticker-posts

स्वातंत्र्य दिनानिमित्त "हर घर तिरंगा" आणि "संविधान मंच"उपक्रमा अंतर्गत संविधान रॅली व व्याख्यानमालेचे आयोजन...

सुजित एस.धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098

       
जामखेड :- महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, अहमदनगर अधिनस्त अनु.जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा,आरोळेनगर, ता-जामखेड, जि.अहमदनगर या निवासी शाळेत आज दि.13 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी ध्वजारोहन करून शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी मोठ्या उत्साहात संविधान जनजागृती पर घोषणा देत संविधान रॅली जामखेड येथील संविधान चौकापर्यंत काढण्यात आली. 
     यानंतर शाळेत आयोजित संविधान व्याख्यानमाले निमित्त संविधान व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेकडून विनम्र अभिवादन करण्यात आले.
     याप्रसंगी प्रमुख पाहुणे मा.श्री. बाळू ओहोळ सर यांनी विद्यार्थ्यांना संविधान निर्मितीची पार्श्वभूमी व सद्यस्थिती यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती कांबळे मॅडम यांनी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्र व समाजासाठीचे कार्य,  संविधानाचे महत्व याबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली  मार्गदर्शन केले. तसेच निबंध, वक्तृत्व प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या.
      या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभारप्रदर्शन श्रीमती भुजबळ मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. या प्रसंगी सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व बाह्यस्त्रोत कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या