योजना नावापुरत्या की निवडणुकीपुरत्या जनतेसमोर योजनांचा " फ्लॉप शो "
रवी भोंगाने साकोली
साकोली:- शासनाने कितीही चांगले धोरण आखले आणि कितीही चांगल्या योजना घोषित केल्यात. परंतु त्याची वेळेवर अंमलबजावणी झाली नाही तर फजिती कशी होते याचे नमुने अनेकदा आपणास बघायला मिळते. असेच एक दोन नमुने शालेय गणवेश आणि १५ लज्जतदार पदार्थातून समोर आले आहे. शासनाच्या लालफीतशाहीतच शासनाच्या या योजना अडकल्याने या योजना नावापुरत्या की निवडणुकीपुरत्या असा प्रश्न निर्माण झाला असून या योजनांचा " फ्लॉप शो " जनतेसमोर आला आहे. भंडारा जिल्ह्यात मोफत शालेय गणवेशाचे एकूण ६१,५८३ तर साकोली तालुक्यात एकूण ८,१५९ पात्र विद्यार्थी आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वी शासन स्तरावर १ ते ८ वर्गाच्या विद्यार्थ्यांकरता मोफत शालेय गणवेश आणि १५ लज्जातदार पदार्थ देण्याऱ्या योजनांचा समावेश करण्यात आला होता.१ जुलैपासून या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार होता. परंतु एक महिना उलटूनही या दोन्ही योजनेच्या लाभ विद्यार्थ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे गणवेशामुळे पालक आणि शिक्षकांची डोकेदुखी वाढली आहे. शासन स्तरावर शालेय गणवेश विद्यार्थ्यांना न पुरविल्याने विद्यार्थ्यांना शालेय गणेशातच या असे कसे म्हणावे असा यक्ष प्रश्न शाळा प्रशासमोर उभा राहिला आहे. सदर शासनाच्या योजना शासनाच्याच लालफितशाहीतच अडकल्याने सध्या तरी शासनाचा या योजनेच्या " फ्लॉप " शो जनतेसमोर आला आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या एक राज्य एक गणवेश या योजनेअंतर्गत यावर्षी राज्यातील वर्ग एक ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येणार आहे. भंडारा जिल्ह्यात गणवेशाचे कापड प्राप्त झाले असले तरी शंभर रुपयात गणवेश शिवून देण्यासाठी कोणी तयार होत नसल्याने अद्याप एकाही विद्यार्थ्याला गणवेश मिळू शकला नाही. १५ ऑगस्ट पूर्वी हे गणवेश विद्यार्थ्यांना मिळणार की नाही यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत. राज्यातील सरकारी स्थानिक स्वराज्य संस्थाशी संबंधित असणाऱ्या शाळांमधील वर्ग एक ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने जून महिन्यात शासन निर्णय काढला. भंडारा जिल्ह्यातील शाळा १ जुलैपासून सुरू झाल्यात. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश मिळणे अपेक्षित होते. परंतु शालेय शिक्षण विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे महिनाभराचा कालावधी उलटूनही गणवेशाचे साधे कापड सुद्धा कापून झालेली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांची डोकेदुखी वाढलेली आहे.भंडारा जिल्ह्यात या योजनेत पात्र विद्यार्थी संख्या ६१हजार ५८३ इतकी असून साकोली तालुक्यात ८ हजार १५९ इतकी पात्र विद्यार्थ्यांची संख्या आहे.या विद्यार्थ्यांसाठी गणेशाचे कापड संबंधित पंचायत समिती कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. मात्र कापड पुरवठादार यांच्याकडून वर्गणिहाय कापड कापण्याची कारवाई प्रलंबित आहे. गणवेश शिवून देण्यासाठी संबंधित संस्थेला १०० रुपये मिळणार आहेत .परंतु तुटपुंज या शंभर रुपयात गणवेश शिवून देण्यासाठी कोणीही तयार होत नाही. त्यामुळे गणवेशाची वाटप प्रक्रिया लांबणीवर पडलेली आहे. दुसरीकडे राज्य शासनाने आहारासाठी शाळांना सुचवलेल्या पदार्थांची केवळ खिचडी वरण-भात आणि उसळ अशा मर्यादित खाद्यपदार्थ ऐवजी यावर्षीपासून १५ लज्जतदार पदार्थांची चव शालेय विद्यार्थ्यांना चाखायला मिळणार होती. पण जवळपास महिना उलटूनही राज्यातील ८६ हजार ५०० शाळांमधील १ कोटी ३ लाख विद्यार्थ्यांना अद्यापही १५ लज्जतदार पदार्थांचा लाभ मिळाला नाही. ज्ञानाच्या जोडीने अन्नाची गोडी लागावी हा या योजने मागचा उद्देश. मात्र सध्या ही योजना देखील लाल फीतशाहीतच अडकल्याचे दिसून येते. त्यामुळे राज्य शासनाने थाटामाटात घोषित केलेली योजनांचा दुसरा " फ्लॉप शो " दिसून आला आहे.


0 टिप्पण्या