मिलिंद गायकवाड चित्रा न्यूज
पुणे: - गुरुवार दि ९ ऑगस्ट २०२४ कलेक्टर कचेरी ते सिंचन भवन ते पुणे महापालिके मोर्चा निघणार असून या मोर्चाच्या तयारी संदर्भात बोपोडी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सौ सुनिता परशुराम वाडेकर ( मा उपमहापौर पुणे ) यांच्या नेतृत्वाखाली तयारी संदर्भात बैठक पार पाडली यावेळेस नागरिकांचा प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला सदर मोर्चाला बोपोडी विभागातून किमान १००० हुन अधिक नागरिक सहभागी होतील असा निर्धार बैठकीत करण्यात आला बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी रिपाई नेते परशुराम वाडेकर, शहर अध्यक्ष संजय सोनवणे, मा उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, रिपाई नेते बाळासाहेब जानराव , उपस्थित होते बैठकीचा आभार शिवाजीनगर मतदार संघ अध्यक्ष अविनाश कदम यांनी मांडले
पाऊस असो या वादळ , आम्ही आमच्या न्याया हक्कसाठी पूरग्रस्तांच्या निर्धार मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत


0 टिप्पण्या