Ticker

6/recent/ticker-posts

द युवा ग्रामीण पत्रकार संघ अशी एक संघटना आहे ,की ज्यामध्ये कोणत्याही व्यक्तीला कुठल्याही पदाचा गर्व किंवा अहंकार नाही.


सोनू संजीव क्षेत्रे चित्रा न्युज ठाणे


ठाणे :- द युवा ग्रामीण पत्रकार संघ राज्य पातळीवर काम करणारा प्रत्येक पदाधिकारी पदाधिकाऱ्यांपासून ते सभासदा पर्यंत सर्वांचे फोन उचलतात, अडचणीच्या वेळी धावून जातात ,त्यामुळे संघटनेला बळकटी निर्माण होऊन संघटना सध्या प्रगतीपथावर आहे संघटना हा एक ग्रुप किंवा संघटन नसून हे आपले कुटुंब आहे .आणि प्रत्येकाने आपल्या कुटुंबासाठी असलेली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडल्यास आपली संघटना नक्कीच महाराष्ट्रात नावलौकिक होईल त्यासाठी जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष व इतर पदाधिकारी यांनी आपली भूमिका तसेच सामाजिक कार्य संघटनेच्या माध्यमातून सुरू ठेवल्यास इतरांनाही प्रेरणा मिळेल ,कोणतेही सामाजिक काम करायला पैसा लागत नाही ,उदाहरण घ्यायचे ठरले तर आपण चर्चेत राहण्यासाठी १)वृक्षारोपण २)मार्गदर्शन शिबिर ३)पत्रकारांच्या कुटुंबाची आरोग्य तपासणी ४)अडचणीत असलेल्या लोकांना मदतीचा हात ५)अपघातग्रस्तांना मदत ६) वाहतूक पोलिसांसोबत नागरिकांना वाहतुक नियमावलीचे मार्गदर्शन अशा विविध उपक्रम राबवून आपण संघटनेचे नावलौकिक करू शकतो ,यासाठी प्रत्येकामध्ये काम करण्याची जिद्द व चिकाटी असावी .आपल्या संघटनेकडून वर्षभरात चांगल्या काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा आपण गौरवही करणार आहोत सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये खूप छान पद्धतीचे काम सुरू आहे ,त्याचेच अनुकरण इतर पदाधिकाऱ्यांनी ही करणे गरजेचे आहे प्रत्येक जिल्हाध्यक्षांची जबाबदारी आहे ,की महिन्याकाठी एक तरी सामाजिक उपक्रम संघटनेच्या नावे केल्यास संघटनेचे नाव त्या त्या जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे होऊ शकते. या सामाजिक कार्यातून प्रशासन नागरिक यांच्यापर्यंत संघटनेचे नाव जाऊन आपल्यालाही तेवढ्याच मानसन्मान मिळणार आहे…

द युवा ग्रामीण पत्रकार संघ 
राष्ट्रीय अध्यक्ष- अन्सार शेख

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या