रुपाली डोंगरे चित्रा न्युज
मुंबई:-बदलापूर येथील घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे. या घटनेत अत्याचार करणाऱ्यांना रस्त्यावर चिरडून मारावे, असा तीव्र संताप आ. संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे. कायद्याचे पालन करण्यासाठी वेळ लागेल, मात्र आता निर्णय घेण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल शिरसाट यांनी तीव्र संताप व्यक्त करत, असा प्रकार सहन करणे आता अशक्य आहे, असे सांगितले. "नराधमाला ठेचायची वेळ आली तर सुरुवात आम्ही करू. आरोपी भेटला तर त्याला रस्त्यात ठेचा," असे त्यांनी ठणकावले. यासाठी कायदा हातात घेतला तरी चालेल, असा इशारा त्यांनी दिला.
शिरसाट यांनी विरोधकांना देखील आवाहन केले की, या घटनेचे राजकारण करू नये. "लिंगपिसाट लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. सरकार आपले काम करत आहे, पण या विषयावर राजकारण करू नका," असे ते म्हणाले. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देताना त्यांनी सर्व नागरिकांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.
0 टिप्पण्या