Ticker

6/recent/ticker-posts

वसमतच्या लालबहादुर शास्त्री विद्यालयाच्या चिमुकल्या मुलींनी जनतेच्या शांती व सुव्यस्थेकरिता 24 तास कर्तव्यात व्यस्त असलेल्या पोलीस बांधवाना राख्या बांधुन रक्षा बंधन सन साजरा केला.


मोईन कादरी हिंगोली 
हिंगोली :-बहिण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. मात्र सदैव ‘ऑन ड्युटी’ असलेल्या सैन्य दलातील जवान आणि पोलिस कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनासह इतर सण साजरा करता येत नाही. आज सोमवारी रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून वसमत  येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या चिमुकल्या विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष वसमत पोलिस ठाण्यात जाऊन पोलिस निरीक्षक  वाघमारे  आणि इतर कर्मचाऱ्यांना राख्या बांधून हा पवित्र सण साजरा केला. वाघमारे यांनी देखील ओवाळणी म्हणून त्यांच्या रक्षणाची जबाबदारी घेत अडचणीच्या वेळेस तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले. 

आपत्कालीन परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी अहोरात्र झटणारे आणि कायदा - सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांना वेळेचे बंधन नसते. समाजासाठी आपल्या भूमिका बजावताना अनेकदा पोलिसांना आपल्या कुटुंबियांना वेळ देणे शक्य होत नाही. अनेक सणवार त्यांना कुटुंबियांसोबत साजरे देखील करता येत नाहीत. दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी अनेक पोलिस गावाकडे असलेल्या बहिणीला भेटून सण साजरा करू शकत नाहीत, त्यामुळे यंदा हा सण पोलिसांसोबत साजरा करावा, अशी संकल्पना लाल बहादूर शास्त्री विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्री संदीप चव्हाण  यांनी मांडली.
आज सकाळी आकरा वाजता प्राचार्य  प्रमोद डोंबे व प्राचार्य  सचिन लाटकर यांनी विद्यार्थिनी आणि शिक्षिकांसह पोलिस ठाणे गाठले. यावेळी विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या पोलिस निरीक्षक  वाघमारे (शहरी विभाग) सहाय्यक पोलिस निरीक्षक  बालाजी महाजन(ग्रामीण विभाग) तसेच इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बांधल्या. रस्त्यावर वाहतूक नियंत्रित करण्याऱ्या वाहतूक पोलिसांना देखील राखी बांधून ओवाळले. चिमुकल्या विद्यार्थिनींनी राखी बांधल्याने सर्वच पोलिस कर्मचारी आणि अधिकारी भारावले होते. शाळेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 
यावेळी पोलिस स्टेशन वसमत शहर. मा. पोलिस निरीक्षक  वाघमारे,केंद्रे, पोलिस अमलदार  वाघमारे, गारोळे,  माहत्रे,  चव्हाण, हगवणे, दळवी, जोंधळे, कदम, पुकाडे,
त्याच बरोबर  वसमत ग्रामीणचे पोलीस स्टेशन वसमत ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री बालाजी महाजन, पीएसआय  एस.एम मुपडे,पोलीस हवालदार  विश्वनाथ खंदारे, नामदेव बेंगाळ, साहेबराव चव्हाण,  जयकुमार वराडे.आदी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
 पोलिस कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या