जि.प. कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव/सडक येथे शालेय मंत्रिमंडळ स्थापन
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- भारतीय लोकशाही काय असते याचे सुंदर उदाहरण जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव/सडक येथे प्रत्यक्ष अनुभव घेतलें आहे. इयत्ता ५ ते १२ चे विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी निवडणुक हक्क मिळण्यापूर्वी निवडणुका काय असते हे जाणून घेतले. ज्याप्रमाणे ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणुकीत मतदान असते ते अगदीं नियमानुसार घडवून आणले. शाळेचे मुख्याध्यापक पी.एम. गायधनी आणि त्यांचे सर्व सहकारी शिक्षकवृंद यांनी भंडारा जिल्ह्यात पारदर्शक निडणुक घडवून आणणारी पहिली जिल्हा परिषद शाळा पिंपळगाव/सडक येथे निवडणुकीत २४ उमेदवारांनी शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरले. त्यात ०२ उमेदवार अविरोध निवडून आले. २२ उमेदवार निवडणुकीत उभे होते. निवडणुक अगदी भारतीय निवडणुक आयोग यांच्या नियमानुसार घडवून आणली गेली. प्रचारासाठी उमेदवारांना वेळ उपलब्ध करून देण्यात आली. आचार संहिता काय असते ते शिक्षक सराटे यांनी समजावून सांगितले. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची माहिती शिक्षक भुरे यांनी विद्यार्थ्यांना दिली. शाळेत प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया शांततेत निकोप वातावरणात पार पडली. शाळा नायक पदी गौरव बाबु मेश्राम निवडूण आले. निवडणुकीचे निवडणूक आयुक्त- मुख्याध्यापक पी.एम. गायधनी होतें. तर निवडणूक निर्णय अधिकारी एन. डी. भुरे, जी.झेड सराटे, केंद्राध्यक्ष डी. ए. निखाडे, मतदान अधिकारी बी. बी. मांढरे, बी. पी. सोनवाणे मॅडम, शरद साळवे, मतमोजणी अधिकारी एस. जी. राठोड, पी. एन. वासनिक, पी. एम. पेटकर, सहकार्य एस. सी. गिरेपूंजे मॅडम, वाय. जी. पोवळे, जे. ए. सेलोकर मॅडम व सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. या नवीन उपक्रमामुळे परिसरात शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे. यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल हे विशेष.


0 टिप्पण्या