कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा :- भंडारा गोंदिया लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार डॉ. प्रशांत यादवराव पडोळे हे गुरुवार(ता.२२ ऑगस्ट) रोजी लेखाशीर्ष २५१५ अंतर्गत काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे प्रयत्नातून मंजूर विकास कामाचे भूमिपूजन प्रसंगी लाखनी तालुक्यात आले असता न्याहारवानी/डोंगरगाव येथील शारदा बहुद्देशीय महिला मंडळ यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट देऊन त्यांच्या समस्या समजून घेऊन निराकरण करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी सांगितले. या प्रसंगी महिला मंडळाच्या अध्यक्षा गोदाबाई चामट, उपाध्यक्षा सुमित्रा तीतीरमारे, सचिव विना नागलवाडे, कार्यकारिणी सदस्या नलिनी नागलवाडे, वानीता फेंडर, राधाबाई चामट, शागुना नागलवाडे, पुष्पा नागलवाडे यांचेसह मार्गदर्शक गंगाराम निंबार्ते, ईसापूर चे उपसरपंच राजेश इसापुरे प्रामुख्याने उपस्थित होते.


0 टिप्पण्या