मोईन कादरी हिंगोली
हिंगोली:- वसमत शहरातील बाजार पेठेतील सर्व व्यापारी बांधवाना अवाहान करण्यात येते की सध्या श्री गणेशाचे आगमन व विविध उत्सवाचे आगमन होत असल्याने बाजारपेठेत वाहनांची गर्दी होऊन वयोवृध्द ,महीला बालकांना सह सर्व नागरिकांना त्रास होत असल्यामुळे वाहतुक नियंत्रन ,वाहन तळ निश्चित करणे आवश्यक आहे शहरातील वाढत्या गर्दी मूळे पोलीस प्रशासनाने वरिल निर्णय घेतला आहे.
बाजार पेठेतील व्यापारी बांधवानी रोड वर जाहीरातीच्या पाटया व इतर साहित्य ठेऊ नये रोडवरील रहदारी मुळे ट्राफीक जॅम होऊ नये या करिता पोलीस प्रशासनास सहकार्य करावे . वाहनचालक नागरीकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे . पोलीस प्रशासनाने घालुन दिलेल्या सुचनाचे पालन न केल्यास त्यांच्या वर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल .
सदरील नियम 26 ऑगस्ट 024 सोमवार पासुन अमलात येतील असे शहर पोलीस प्रशासनाचे वतीने कळवीण्यात येत आहे सर्व व्यापारी व नागरीकांनी नोंद घेऊण जनहितार्थ प्रशासनास सहकार्य करावे . असे आव्हान वसमत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे व सर्व पोलीस कर्मचारी यांच्याकडून आव्हान करण्यात आलेली आहे


0 टिप्पण्या