Ticker

6/recent/ticker-posts

वसमत येथे जिल्हा स्तरीय शालेय बॉक्सींग व ज्युडो स्पर्धा सपंन्न

मोईन कादरी हिंगोली
हिंगोली :-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पूणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली जिल्हा बॉक्सिंग व ज्युडो असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरीय शालेय ज्युडो व बॉक्सींग स्पर्धेचे दि.23.8.2024 आयोजन हु. बहीर्जी स्मारक महाविद्यालय बहुउद्देशीय हॉल ,वसमत येथे करण्यात आले होते .
  या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष पद लक्ष्मीकांत नवघरे यांनी भूषवीले तर बॉक्सींग स्पर्धेचे उद्घाटक म्हणून 
फुटबॉल असोशिएशन चे अजगर पटेल , व ज्युडो स्पर्धेचे उद्घाटक मुख्याध्यापक श्री प्रविण शेळके सर हे लाभले तर प्रमुख उपस्थितीत जिल्हाक्रीडा अधिकारी श्री राजेश्वर मारावार सर, श्री आत्माराम बोथीकर सर, गोपाल  इसावे , अजगर पटेल ,संजय सौदा ,गजानन नवघरे ,मोबीनभाई ,सुनिल भाऊ कातोरे ,बालासाहेब गरूड ,संतोष नांगरे , प्रकाश अडकीणे बांगर नवनाथ, कृष्णा देवणे, रूपेश एंगडे, मो.नवीद अदि मान्यवर उपस्थीत होते. जिल्हयातील शालेय खेळाडुंनी सहभाग नोंदवीला होता. जिल्हा बॉक्सींग असोशिएशन चे सचिव फेरोज पठाण सर व जिल्हा ज्युडो असोशिएशन चे सचिव एम.ए.बारी सर यांनी स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केले होते .
प्रा. महेताब पठाण सर यांनी सुत्रसंचलन केले तर फेरोज पठाण सर यांनी आभार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या