रवी भोंगाने साकोली
साकोली:- येथील पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांचे स्थानांतरण होऊन वर्धा येथून संजय गायकवाड साकोली पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झालेले आहेत. दुसरीकडे साकोली पोलीस स्टेशन इमारत त्यांच्यासाठी नवीन आहे. त्यामुळे ठाणे, नाशिक, भिवंडी, मुंबई येथुन नव्याने आलेले ठाणेदार यांना साकोली पोलिस स्टेशनची सुसज्ज इमारतnआणि तालुका रास येईल का ? महाराष्ट्र राज्य निवडणुकीचे वारे वाहू लागलेत. सहाजिकच निवडणूक विभाग कामाला लागला. शासनाने ३ वर्षावरील एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे स्थानांतर करणे सुरू केले. तसेही नियमाप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांचे स्थानांतर करणे आवश्यक असते किंवा एखादी लोकशाहीची निवडणूक पार पडली असेल तर अशाही कर्मचाऱ्यांचे स्थानांतर केले जाते. त्याप्रमाणे लाखांदूर येथून स्थानांतर होऊन आलेले साकोलीचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांचे स्थानांतर करण्यात आले. त्या ठिकाणी संजय गायकवाड नवीन ठाणेदार म्हणून रुजू झाले आहेत. गायकवाड हे वर्धेवरून आले आहेत. यापूर्वी त्यांनी भिवंडी, मुंबई, ठाणे अशा ठिकाणी कार्य केले आहे. त्यामुळे शहरातील मोठ्या राजकीय नेत्यांचा अभ्यास त्यांना दांडगा असायला हवा. विदर्भ ग्रामीण भागात. त्यातही भंडारा जिल्हा. भंडारा जिल्ह्यातील साकोली शेवटच्या टोकावरचा तालुका. येथील राजकीय अनुमान करायला गायकवाड यांना वेळ लागणार नसला तरी ग्रामीण भागातील राजकारण हलकेपणाने घेता येणार नाही. अशातही नवीन ठाणेदार यांना नवीन इमारत मिळाली. यापूर्वीचे ठाणेदार कोकाटे यांना काहीच महिने या इमारतीत कारभार करता आला. साकोली येथील पोलीस नवी इमारत सुसज्ज जनतेच्या सेवेत आहे. साकोलीत बऱ्याच वर्षांत जर काही बदल झाला असेल तर तो आहे ग्रामपंचायतचे रूपांतर नगर पंचायत आणि पंचायतचे रूपांतर नगरपरिषद. नंतर तहसील, पंचायत आणि आता पोलीस स्टेशन इमारत. कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पंचायत समितीची नवी इमारत अशुभ ठरली. कारण येथील अधिकारी लाचलुचपतमध्ये अडकला.
0 टिप्पण्या