Ticker

6/recent/ticker-posts

अन्यथा बंदी घातलेली औषधे पार्सलने पाठविणार - राजेंद्र पातोडे.


संघदीप मेश्राम चित्रा न्युज
अकोला : सामान्य रुग्णाच्या आरोग्याला धोकादायक आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बंदी घातलेली १५६ औषधे शासकीय रुग्णालये आणि बाजार तसेच मेडिकल स्टोअर मधून तातडीने जप्त करणे आवश्यक असताना राज्याचा आरोग्य विभाग निष्क्रिय असून या धोकादायक औषधी तातडीने जप्त करून नष्ट करा अन्यथा बंदी घातलेली औषधे आरोग्य विभागाला निषेध म्हणून पार्सलने पाठवू असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीचे वतीने प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी आरोग्य मंत्री, सचिव आणि औषधी खरेदी विभागाला मेल वर दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

आरोग्य मंत्रालयाने म्हणणे आहे की, ही बंदी घालण्यात आली असली तरी राज्याच्या आरोग्य विभागाने अद्याप बंदी घातलेली औषधे शासकीय रुग्णालये, सामान्य नागरिकाच्या वापरात तसेच सर्व मेडिकल स्टोअर वर सहज उपलब्ध आहेत. सामान्य नागरिकाच्या जीवाला आणि आरोग्याला धोका निर्माण करणारी सदर औषधे तातडीने जप्त करणे आणि ती नष्ट करणे ही राज्य आरोग्य विभागाने करणे अपेक्षित आहे.मात्र त्याबाबत कुठलाच ठोस कृती कार्यक्रम किंवा धाड सत्र अथवा जप्ती करण्याची कार्यवाही करण्यात आलेली नाही.

वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेशचे वतीने सामान्य नागरिकाच्या हिता साठी अनोखा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बंदी घातलेली १५६ औषधे शासकीय रुग्णालये आणि बाजार तसेच मेडिकल स्टोअर मधून जप्त करणे बाबत आठ दिवसात देवून तातडीने कार्यवाही सुरू करण्यात यावी. अन्यथा बंदी घालण्यात आलेली औषधे गोळा करून आपल्या विभागाला पाठविण्याचे आदेश वंचीतच्या जिल्हा आणि तालुका शहर पदाधिकारी कार्यकर्ते यांना देण्यात येतील असा इशारा सदर निवेदनातून देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या