चित्रा न्युज ब्युरो
गडचिरोली :-भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंद जी नरोटे यांचा आज दिं.-२८आक्टोंबर २०२४ रोज सोमवारी नामांकन अर्ज भरण्यासाठी माजी खासदार श्री. अशोकजी नेते यांच्या जनसंपर्क कार्यालय गडचिरोली येथुन ढोल ताशांच्या गजरात महारँली सुरुवात यात महायुतीचे सन्मानित अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.
गडचिरोली -६८, विधानसभा निवडणूक २०२४ भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार मान.श्री. डॉ. मिलिंद जी नरोटे यांचा नामांकन अर्ज भरण्यासाठी माजी खासदार यांच्या जनसंपर्क कार्यालय गडचिरोली ते तहसील कार्यालय, पर्यंत आयोजित ‛भव्य नामांकन फार्म भरण्यासाठी महारॅली’ त माजी खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तसेच सहसंयोजक विधानसभा निवडणूक संचालन समिती महाराष्ट्र राज्य अशोकजी नेते यांनी भाजपा- महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंदजी नरोटे यांचे गडचिरोलीत नामांकन दाखल करण्यासाठी पुष्पगुच्छाने स्वागत व विजयी भव असे अभिनंदन करत भाजपा महायुतीच्या काढलेल्या महारँलीत प्रचंड जनसमुदायात सहभागी व उपस्थित झाले.
यावेळी विधान परिषदेचे आमदार मान.डॉ. परिणयजी फुके, जिल्हाध्यक्ष प्रशांत जी वाघरे,प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र जी ओल्लालवार,जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.प्रणयजी खुणे,राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष रविंद्र जी वासेकर,भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, सहकार प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष आशिषभाऊ पिपरे,समन्वयक प्रमोदजी पिपरे, राष्ट्रवादी युवा मोर्चा चे जिल्हाध्यक्ष लिलाधरजी भरडकर,जेष्ठ नेते सुधाकरराव येंनगदलवार,जिल्हा सचिव रंजिताताई कोडापे, नंदकिशोर काबरा,कीर्तीकुमार मासुरकर तसेच मोठ्या संख्येने महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


0 टिप्पण्या