Ticker

6/recent/ticker-posts

येवला शहर पोलिसांची धडक कारवाई:

 

अवैधरित्या वाहतूक होणारी देशी-विदेशी दारू जप्त, दोन जणांना अटक

चित्रा न्युज ब्युरो
नाशिक :-येवला शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध दारू वाहतूकीविरोधात मोठी कारवाई करत पारेगाव रोडवरून दुचाकीवर अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या दोन व्यक्तींना अटक केली. पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान पोलिसांनी एकूण 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यामध्ये 28 हजार रुपयांची देशी-विदेशी दारू आणि वाहतुकीसाठी वापरलेली दुचाकी समाविष्ट आहे.

येवला शहर पोलीस पथकाला पारेगाव रोडवरून दुचाकीवरून अवैधरीत्या देशी आणि विदेशी दारू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्काळ एक पथक तयार करून संशयित दुचाकीचा पाठलाग केला आणि त्याठिकाणी दोन व्यक्तींना ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान, त्यांच्या ताब्यातील दारूचे बॉक्स आणि दुचाकी जप्त करण्यात आली.

पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या संदर्भात येवला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी सांगितले की, "दारू वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि या अवैध धंद्याशी संबंधित इतर लोकांवरही लक्ष ठेवले जाईल."

या कारवाईमुळे येवला परिसरात अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांना मोठा धक्का बसला असून पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या