Ticker

6/recent/ticker-posts

औरंगाबादमध्ये फुले, शाहु,आंबेडकरवादी क्रिएटर्स मिट अप !

चित्रा न्युज ब्युरो
औरंगाबाद : औरंगाबाद येथे रविवारी( दि.27) फुले, शाहू, आंबेडकर यांना मानणाऱ्या सोशल मीडिया क्रिएटर्स यांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते.  यावेळी शेकडो फुले, शाहू, आंबेडकरवादी सोशल मीडिया क्रिएटर्स उपस्थित होते. या संमेलनाला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते, सुजात आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले. 

प्रबुद्ध भारत मीडिया आणि बोधिसत्व यांनी या सोशल मीडिया संमेलनाचे आयोजन केले होते. महाराष्ट्रातला सुप्रसिद्ध म्युझिक प्रोड्युसर DJ. Mayur ABD, महाराष्ट्रातला सुप्रसिद्ध डान्सर नागपूरचा पोट्टा अयुप परिपगार, ख्यातनाम गायक मेघानंद जाधव, महाराष्ट्राचा लाडका DJ HK Style, सौरभ अभ्यंकर (MTV Hustle Fame Rapper), यांच्यासह शेकडो क्रिएटर्स उपस्थित होते.
---


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या