चित्रा न्युज ब्युरो
भंडारा :-आशिता (भरतनाट्यम क्लास) च्या वतीने खांबतलाव क्लास रूम मध्ये नुकतेच घुंगरू पुजन कार्यक्रम पार पडले. या प्रसंगी क्लासेस चे गुरु ऋषी पोहनकर नागपूर, सामाजिक कार्यकर्ते सईद भाई शेख ई मान्यवर पाहुणे प्रामुख्याने उपस्थित होते . आशिता क्लास च्या संचालिका सौ चंदा मुरकुटे यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.गुरूंनी या प्रसंगी मुलींचे नृत्य सादरीकरण करवून घेतले .प्रशिक्षण घेणाऱ्या मुलींनी गुरूंना गुरुभेंट म्हणून फळ व इतर वस्तू रूपाने भेट दिल्या.
0 टिप्पण्या