राजेश येसेकर भद्रावती
भद्रावती : तालुक्यातील कुचना येथील एका घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी करीत आलमारीतील पाच हजार रुपये व सोन्याचे दागिने असा एकुण दोन लाख तीस हजार रुपये ऐवज लंपास केले.
हि घटना दि. २५ रोज शुक्रवारला सकाळी सात वाजता उघडकीस आली. सदर या घटनेची तक्रार माजरी पोलीसांत देण्यात आली. असुन माजरी पोलीसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुचना येथील माया पारखी ह्या मुली व नातवंडासह घराच्या हॉलमध्ये झोपल्या असतांना अज्ञात चोरट्यांनी रात्रोला घरात प्रवेश करुन कपाटातील पाच हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने लांबविले या घटनेतील आरोपींचा शोध घेण्यासाठी श्वानपथक व ठसे तज्ञ पथकांची मदत घेण्यात आली. मात्र चोरांचा शोध लागला नाही. घटनेचा पुढील तपास माजरी पोलीस करीत आहे.


0 टिप्पण्या