Ticker

6/recent/ticker-posts

खंडणी मागणाऱ्या मुलासह बापावर गुन्हा चोपडा शहरातील घटना, शिक्षकाच्या मुलाला अटक

पंकज पाटील विभागिय संपादक नाशिक


जळगाव :-चोपडा शहरातील नावाजलेल्या निर्मल दूध डेअरी वरून दूध घेऊन ते दूध घरी जाऊन त्या दुधाला तापून त्यावर आलेल्या सायचा व्हिडिओ तयार करून ती साय नसून ती प्लास्टिक आहे. असा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला आणि निर्मल दूध डेअरी चे मालक प्रल्हाद पाटील यांना व्हॉट्सपवर तो व्हिडीओ टाकला. आणि - व्हिडिओ मी सोशल मीडियावर - टाकून आपल्या दूध डेअरी ची - बदनामी करेल. असे धमकावले व - एक लाख रुपये प्रल्हाद पाटील - यांच्याकडून मागणी करणाऱ्या व बिडगाव येथील मुलाचे वडील माध्यमिक शिक्षक यांच्याविरुद्ध चोपडा शहर पोलिस ठाण्यात खंडणीच्या गुन्हा दाखल करण्यात - आला असून मुलास अटक करण्यात आली आहे. शहरातील निर्मल दूध डेअरी येथून ऋषी संजय - पाटील हा १९ रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास दूध घेऊन गेलाऋषी पाटील याने घरी जाऊन दूध तापवले आणि त्या तापवलेल्या दुधाच्या सायचा खोटा व्हिडीओ तयार केला होता. आणि त्या खोट्या व्हिडीओ च्या आधारावर डेअरी मालक प्रल्हाद पाटील यांना धमकावून एक लाखाची मागणी केली. आणि काही ग्रुपवर देखील तो व्हिडिओ व्हायरल देखील केला होता.२० रोजी सकाळी साडे नऊ वाजता ऋषी पाटील व त्याचे वडील संजय पाटील यांनी प्रल्हाद पाटील यांना विषय संपवुन टाका असे सांगितले. यावरून प्रल्हाद पाटील यांनी घाबरून ऋषी पाटील याला ७५ हजार रोख रक्कम दिली. प्रल्हाद पाटील यांनी शहर पोलिसांना हे सांगितले. त्यावरून २६ रोजी मुलगा ऋषी पाटील आणि वडील माध्यमिक शिक्षक संजय, पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पूढील तपास पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या