Ticker

6/recent/ticker-posts

दिवाळीपूर्व वेतन आणि निवृत्ती वेतन झाल्याने कर्मचाऱ्यात आनंदाचे वातावर

20%अनुदान प्राप्त शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मिळाले वेतन
 
10 ते 15 वर्षाची प्रतीक्षा संपली 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा -भारतातील सर्वात मोठा सण दिवाळी 1 नोव्हेंबर पासून सुरु होत आहे. हा सण आनंदात व उत्साहात जावा यासाठी दिवाळीपूर्व वेतन आणि निवृत्तीवेतन व्हावे अशी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनाची मागणी होती. त्यानुसार शासनाने 24 ऑक्टोबरला शासन निर्णय निर्गमित केला की दिनांक 31 ऑक्टोबर 2024रोजी देय होणाऱ्या माहे ऑक्टोबर 2024च्या वेतन आणि निवृत्तीवेतनाचे प्रदान 25 ऑक्टोबर पुर्वी प्रदान करावेत असे आदेश काढले होते. या आदेशाची अंमलबजावणी व्हावी म्हणून भंडारा जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेत्तर कर्मचारी संघाने पाठपुरावा केला अखेर त्यांच्या प्रयत्नला यश येऊन लेखाशीर्ष 3361,3379,511,H973,469,558व 0084 अंतर्गत खाजगी शाळेतील अनुदानित व अंशत अनुदानित शाळावर काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना 25 ऑक्टोबर च्या रात्री 9 वाजेपर्यंत वेतन त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले. प्रथमच 20 %अनुदानवर आलेल्या शाळातील शिक्षकांना 10 ते 15 वर्षानंतर पहिले वेतन प्राप्त झाल्याने त्यांच्या आनंदाला पारावर नव्हता.शिक्षक व कर्मचारी यांना दिवाळीपूर्व वेतन मिळावे म्हणून शिक्षणाधिकारी रवींद्र सलामे, वेतन पथक अधीक्षक प्रभा दुपारे, सुनिल मदारकर, जिल्हा कोषागार अधिकारी मंगला डोरले, मगर साहेब तसेच प्रीतम पिसे व शिवरकर मॅडम यांनी विशेष सहकार्य केले याबद्दल भंडारा जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे नागपूर विभागीय कार्यवाह जिवनदास सार्वे जिल्हाध्यक्ष सैनपाल वासनिक कार्यवाह गंगाधर भदाडे,कार्याध्यक्ष संजय ब्राम्हणकर उपाध्यक्ष ऋषिकेश डोंगरे, उपाध्यक्ष जगदीश धांडे,उपाध्यक्ष होमेस्वर गोमासे,सहकार्यवाह संदीप सेलोकर,सहकार्यवाह संजय मोहतुरे,कोषाध्यक्ष मंगेशजी हलमारे,प्रसिद्धीप्रमुख उमेश कापगते, प्रदीप सपाटे,महिला प्रतिनिधी श्रीमती मंगला मारवाडे,कु.शालू भटके,प्रतिक्षा वाघाये यांनी सर्वांचे अभिनंदन आणि आभार मानले. 
 
प्रतिक्रिय

टप्पा अनुदानवर असलेल्या आणि प्रथमच 20 टक्के अनुदान प्राप्त झालेल्या आणि पहिला पगार उचलणाऱ्या शिक्षक -कर्मचाऱ्यांना आनंद झाला असून हा कृती समितीच्या संघर्षाचा परिणाम आहे . 

प्रविण गजभिये अध्यक्ष विना अनुदानित व अंशता अनुदानित कृती समिती
 

प्रतिक्रिया

दिवाळीच्या पुर्वी सर्वच लेखाशीर्षकाचे पगार लागल्याने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची दिवाळी गोड होणार आहे. सर्व लेखाशीर्षकांचे वेतन असेच दर महिन्याला शासनाने नियमित प्रदान करावेत अशी अपेक्षा . 

विनोद किंदर्ले कार्यवाह शिक्षक भारती संघटना

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या