शिवनगर मुरमाडी/सावरी येथील घटना
लाखनी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- मुरमाडी/सावरी येथील शिवनगर मध्ये वास्तव्यास असणाऱ्या ४८ वर्षीय इसमाने स्वत:च्या राहते घरी छतावरील पंख्याला पांढऱ्या रंगाच्या कापडी गमछाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी(ता.२५ ऑक्टोबर) रोजी सकाळी ६:१५ वाजता दरम्यान उघडकीस आली. महेंद्र अर्जुन बांबोर्डे(४८) रा. शिवनगर, मुरमाडी /सावरी, तालुका लाखनी असे मृतकाचे नाव आहे. ते गडेगाव येथील अशोक लेलँड कंपनीत कार्यरत होते. वृत्त लिहीपर्यंत आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. घटनेचा तपास लाखनी पोलीस करीत आहेत.
मृतक महेंद्र बांबोर्डे हा गडेगाव येथील अशोक लेलँड कंपनीत कार्यरत होता. शुक्रवारी सकाळी ६:१५ वाजताच्या दरम्यान त्याचा मृतदेह लटकतांना दिसल्याने कुटुंबीयांनी आरडा-ओरड केली असता आजूबाजूचे नागरिक जमा होवून घटनेची माहिती लाखनी पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस घटनास्थळी दाखल झाले. कुटुंबीय व नातेवाईकांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून उत्तरीय परिक्षणासाठी ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. स्थानिक स्मशानभूमीत त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. रियानंद उरकुळा मेश्राम यांच्या फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी मर्ग क्र. ४६/२०२४ कलम १९४ बी एन. एस. नुसार अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा महिला पोलीस नायक पोर्णिमा कान्हेकर तपास करीत आहेत. मन मिळावू महेंद्र च्या अकाली निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
0 टिप्पण्या