Ticker

6/recent/ticker-posts

वसंत देशमुख यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून निषेध व्यक्त...

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098

कर्जत :- संगमनेरमध्ये भाजपच्या प्रचार सभेत भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी वसंत देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या मा. जयश्रीताई थोरात यांच्याबद्दल खालच्या स्तरावर आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे महिलांचा अपमान झाला असल्याचा आरोप करत कर्जत तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत आंदोलन केलं.

महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का देणाऱ्या या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. वसंत देशमुख यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी महिला पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपअधिक्षकांकडे लेखी निवेदनाद्वारे केली.

यावेळी कर्जत महिला तालुकाध्यक्षा महिला पूजा सूर्यवंशी, शहराध्यक्षा प्रीती जेवरे, माजी नगरसेविका पूजा म्हेत्रे, नगरसेविका लंकाताई खरात, नगरसेविका छायाताई शेलार, नगरसेविका सुवर्णा सुपेकर, कांचन भोज यांच्यासह इतरही महिला भगिनी उपस्थित होत्या .

महिलांच्या सन्मानावर कोणतीही तडजोड मान्य नसल्याचे ठामपणे सांगत, त्यांनी सन्मानासाठी एकत्र येऊन आवाज उठवत कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या