Ticker

6/recent/ticker-posts

हिवताप कर्मचारी संघटनेची विभागीय आरोग्य कार्यालयाला धडक

अखेर तिसऱ्या कालबद्ध पदोन्नती चे लाभ  आरोग्य उपसंचालकांनी केले मंजूर
   
चित्रा न्युज प्रतिनिधी 
अमरावती :-उपसंचालक आरोग्य सेवा मंडळ अकोला  डॉ. भंडारी साहेबांची महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मुलन कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे  प्रदेश सरचिटणीस श्री डी. एस. पवार यांचे नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेतली . 
अकोला मंडळातील हिवताप  कर्मचाऱ्यांच्या  प्रस्तावित मागण्यावर चर्चा केली. 
       सातव्या वेतन आयोगामध्ये शासनाने सुधारित आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी १०,२०,३० वर्षे सेवा झाली त्याचे करिता तीन लाभाच्या योजना मंजूर केली असतांना सेवानिवृत्त कर्मचार्यांना तिसरा लाभ अद्यापही मंजूर  केलेला नाही  तसेच वेतन त्रुटी समितीने शिफारस केल्याप्रमाणे हिवताप योजनेतील संवर्गाच्या वेतनश्रेणीमध्ये २ जून २०२५चे शासन निर्णयानुसार वेतनश्रेणी मध्ये  वाढ केली आहे.  त्यावरील कार्यवाही प्रलंबित असल्याचे निदर्शनास आणून दिले. 
     राज्यातील नाशिक कोल्हापूर नागपूर औरंगाबाद या मंडळातील सेवेतील कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी यांना तिसरा लाभ मंजूर करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे  अकोला विभागातील कर्मचाऱ्यांना सदर  लाभ त्वरित मंजूर करण्यासाठी संघटनेकडून आग्रह धरण्यात आला. त्यावर परत केलेले प्रस्ताव  संबधीत जिल्हा हिवताप अधिकारी यांचेकडून या कार्यालयास सादर करण्याच्या सूचना देण्यात  येवुन सेवानिवृत्ताना त्वरित लाभ  मंजूर करण्याचे मान्य केले. हिवताप विभागातील पदोन्नती साखळीतील आरोग्य सेवक या संवर्गामधुन आरोग्य निरिक्षक या पदावरील पदोन्नतीची प्रकरणे ऑगस्ट अखेर पर्यंत  निकाली काढण्याचे मान्य केले. तसेच वेतन त्रुटी समितीचे शिफारशी प्रमाणे  २ जुन २०२५ चे शासन निर्णयानुसार  वेतनश्रेणी मध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. त्याप्रमाणे हिवताप  विभागातील आरोग्य कर्मचारी, आरोग्य निरिक्षक, आरोग्य पर्यवेक्षक व अवैद्यकीय आरोग्य अधिकारी या संवर्गाचे वेतनश्रेणी मध्ये वाढ करण्यात आली आहे. त्याप्रमाणे सेवेतील व सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या फेर वेतन निश्चिती करुन कालबद्ध पदोन्नतीचे प्रकरणासह सर्व  लाभ मंजूर करण्यात यावे. यासाठी अधिपत्याखालील कार्यालयाला निर्देश देण्याचे मान्य केले. 
तसेच बंधपंत्रीत अधिपरिचारिकांचे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण नागपूर चे निर्णयानुसार कार्यवाही करण्यासाठी वरिष्ठांना प्रस्ताव सादर करून त्वरित निकाली काढण्याचे मान्य केले. 
     आज झालेल्या चर्चेत संघटनेचे शिष्टमंडळाने  आक्रमण भुमिका घेतली  एक महिण्यात सर्व मागण्यावर निर्णय न झाल्यास सामुहिक आमरण उपोषण आंदोलन करण्याचा ईशाराही देण्यात आला.यावर ही वेळ संघटनेवर येणार नाही अशी शाश्वती प्रशासनाने दिली. आजच्या बैठकीत संघटनेचे शिष्टमंडळामधे प्रदेश सरचिटणीस डी.एस.पवार, सुभाष वानरे,एन.डी.जाधव,पी.यु.गिरी, अब्दुल जवेद, विनय शेलुरे, एस. एस. लांडे,आर.पी.नागपुरकर, भारत ढोमणे, पी. के. भोकरे,पी.डब्ल्यु श्रीराव ,विजय साळुंके, गजेंद्र तराळ एस.एस.वाडीकर, के. एस. नेहारे,डी.डी..बेंडे,ए.ऐल.चौधरी, के. बी. चोरमले, आर. एल माकोडे, बी.के.कोल्हे, अ. नबी, आर. एम. रामेकर, आर. पी. आवटे, सरकारी कर्मचारी संघटनेचे अकोला जिल्हाध्यक्ष राजेंद्र नेरकर  व अधिपरिचारिका ममता बांगर, ममता चव्हाण व रुपाली राऊत उपस्थित होते. 

        

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या