चित्रा न्युज ब्युरो
भंडारा :-साकोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती तथा भारतीय बौद्ध महासभा शाखा साकोली चे संयुक्त विद्यमाने मंगळवार(ता. २६ नोव्हेंबर) ला स्मारक समिती सभागृहात संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांचे हस्ते सामाजिक कार्यकर्ता सुरेश मेश्राम व अरविंद कठाने यांना संविधानाचे पुस्तक भेट देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्मारक समितीचे उपाध्यक्ष अशोक रंगारी, प्रमुख अतिथी सामाजिक कार्यकर्ता कैलास गेडाम, सेवानिवृत्त वनपाल दादू बडोले, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष विलास मेश्राम, माजी जिल्हा परिषद सदस्य मायाबाई मेश्राम, सामाजिक कार्यकर्ता दीपक साखरे, प्रल्हाद रामटेके, सुरेश मेश्राम, अरविंद कठाने, दुलीचंद तिरपुडे, विजय साखरे, उपासिका रंजना मेश्राम, प्रज्ञा दिरपुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या उद्देशिकेचे वाचनाने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी संविधानाचे महत्त्व विषद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वे संचालनसोनू राऊत तर आभार विलास मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमास बौद्ध उपासक, उपासिका बहुसंख्येने उपस्थित होत्या.


0 टिप्पण्या