साद माणुसकीची समूहाचा उपक्रम
चित्रा न्युज ब्युरो
भंडारा :- लाखनी तालुक्यातील साद माणुसकीची समूह लाखनी या शिक्षकांच्या समूहाने यावर्षी भाऊबीज सनानिमित्ताने शासकीय रुग्णालय व श्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथील रुग्णांना फळ वाटप केले.
२०१७ साली स्थापन झालेला हा शिक्षकांचा समूह दरवर्षी भाऊबीजेच्या दिवशी "भाऊबीज उपक्रम" राबवत असतो. शंभर पेक्षा जास्त सदस्य संख्या असलेला हा शिक्षक शिक्षिकांचा समूह तालुक्यातील अनाथ, विधवा, दिव्यांग, वृद्ध, गरजू व्यक्तींना, त्यांच्या कुटुंबाला विविध प्रकारचे वस्तू रुपात साहित्य देऊन, शिलाई मशीन असे साहित्य देऊन मदत करत असतो तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, रोख रक्कम, सायकल अशा वस्तू रुपात मदत करत असतो.
वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, वृद्धाश्रमाला मदत तसेच प्रासंगिक संकट ओढवलेल्यांना मदत असे वर्षभर आवश्यक ते समाजोपयोगी उपक्रम हा समूह राबवित असल्याने हा समूह चर्चेत आहे.
यावर्षी भाऊबीज हा उपक्रम रुग्णांना फळ वाटप करून साजरा करण्यात आला. याप्रसंगी पुरुषोत्तम झोडे, प्रमोद हटेवार, लालबहादूर काळबांधे, यादवराव गायकवाड, चंद्रशेखर गिरहेपुंजे, प्रमोद खेडीकर, सूर्यभान टीचकुले, यादव मेश्राम, राम चाचेरे, किशोर कठाने, अंजना पिंपळशेंडे, उर्मिला तितिरमारे, मंगला बोपचे, चारू कठाने, उमा टिचकुले, विलास आंबेडारे, उमेश सिंगनजुडे, दुर्योधन गायधने आदि शिक्षक उपस्थित होते.
0 टिप्पण्या