Ticker

6/recent/ticker-posts

उपसभापती कैलास वराट यांच्यावरील अविश्वास ठराव १२-० मतांनी मंजूर;आ. रोहीत पवार यांची बाजार समितील सत्ता संपुष्टात...


सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615

जामखेड :- जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांचे विरोधात दाखल केलेला अविश्वास ठराव १२ विरूध्द ० मतांनी मंजूर झाला असून कैलास वराट यांचा उपसभापती पदाचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. वराट हे आमदार रोहित पवार गटाचे असल्याने आज झालेल्या अविश्वास ठराव बहुमताने मंजूर झाल्याने आमदार रोहित पवारांना कर्जत नगर पालिकेनंतर जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठा धक्का बसला आहे.
 मागील दोन वर्षांमध्ये रोहित पवार गटाने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वेळोवेळी विकास कामांना अडथळे आणल्यामुळे रोहित पवार गटाचे असलेले अंकुश ढवळे, राहुल बेदमुथा व नारायण जायभाय या तीन संचालकांनी जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सभापती नामदार प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्या संचालकांनी सभापती पै. शरद कार्ले यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांच्याकडे उपसभापती यांच्या विरूद्ध एकुण १८ पैकी १२ संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यावर निर्णय घेण्यासाठी आज दि. १० जुलै रोजी  जामखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सभेचे पीठासन अधिकारी अनुपसिंह यादव यांच्या उपस्थितीत विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये अविश्वास ठारावावर झालेल्या मतदान प्रक्रियेत १२ विरूद्ध ० अश्या मतांनी सदरचा अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला असे पिठासिन अधिकारी तथा अहिल्यानगरचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनुप सिंह यादव यांनी जाहीर केले. या ठरावावेळी आ. रोहित पवार गटाचे उर्वरित सर्व संचालक गैरहजर राहिले.
यामुळे आमदार रोहित पवार यांची कैलास वराट यांच्या माध्यमातून बाजार समितीत असलेली सत्ता संपुष्टात आली असून  सभापती प्रा. राम शिंदे यांच्याकडून आमदार रोहित पवारांना जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धक्का देण्याचे काम पुन्हा एकदा केले आहे. 



दरम्यान कैलास वराट यांनी अविश्वास ठरावास आव्हान देण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तीही फेटाळण्यात आली आहे. तसेच आज दि. १० जुलै रोजी अविश्वास ठरावावर मतदान प्रक्रिया चालू असताना कैलास वराट यांनी आपला उपसभापती पदाचा राजीनामा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात ठेवून निघून गेले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या