चित्रा न्युज ब्युरो
अकोला : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर श्रद्धा असल्यानेच डिजिटल चलनाला भीम यूपीआय असे नाव दिल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते. या त्यांच्या विधानाचा वंचित बहुजन युवा आघाडीचे महासचिव राजेंद्र पातोडे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. मोदी अत्यंत खोटा माणूस असल्याचे पातोडे यांनी म्हटले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा गैरवापर करून लोकांना भावनिक करायचा निर्लज्ज प्रयत्न मोदी यांनी केला आहे. मुळात Bharat Interface for Money (BHIM) असे या ॲप चे नाव आहे. यामध्ये कुठेही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव नसल्याचे पातोडे यांनी सांगितले. भीम असा उल्लेख शॉर्ट फॉर्म मध्ये असल्याने ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव ठरते हा मोदीचा फालतूपणा आहे. डिजिटल युगात खोटं बोलण्याचा जागतिक विक्रम मोदींनी केला आहे. असेही पातोडे यांनी म्हटले आहे.
-----


0 टिप्पण्या