चित्रा न्युज ब्युरो
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर हे सध्या महारष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ उमेदवारांसाठी संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालत आहेत. ते मुंबईतील उमेदवारांच्या प्रचारार्थ गेले असताना त्यांनी लोकल ट्रेनने प्रवास केला आहे.
सुजात आंबेडकर हे ज्या लोकलने प्रवास करत होते. त्या लोकल मधील प्रवाशांना सुजात आंबेडकर यांना प्रवास करताना पाहून आश्चर्याचा धक्काच बसला. तसेच अनेकांनी त्यांच्या सोबत फोटो सुद्धा घेतला. प्रवाशांनी सुजात आंबेडकर यांच्या या साधेपणाचे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची अँजीओप्लास्टी झाली असल्याने त्यांना प्रचारासाठी वैद्यकीय कारणांमुळे मर्यादा आहेत. परंतु, युवा नेते सुजात आंबेडकर यांनी पायाला भिंगरी लावून प्रचार सभांचा धडाका लावल्याचे दिसत आहे.
वंचित बहुजन आघाडी जवळपास २०० विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. त्यांच्या सभांना जनतेचा मोठा प्रतिसाद सुद्धा पाहायला मिळत आहे.
---


0 टिप्पण्या