26 /11 च्या मुंबई हल्ल्यामध्ये शहीद झालेले पोलीस जवानांनाही दिली श्रद्धांजली
पंकज खरे जिल्हा प्रतिनिधी रायगड
रायगड :-मंगळवार दिनांक 26 नोव्हेंबर 2024 संविधान गौरव दिनानिमित्त करंजडे सेक्टर 3 येथे कासारे कुटुंबायाच्या घरात तथागत बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा ला पुष्पहार अर्पण करून 26 11 च्या मुंबई हल्ल्यामध्ये शहीद झालेले पोलीस जवानांनाही दिली श्रद्धांजली कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून बहुजन समाज पार्टीचे पनवेल विधानसभा अध्यक्ष खंडू लहाने होते लहाने यांनी भारतीय संविधान तथा काल परवा झालेल्या विधानसभा निवडणुकीविषयी मार्गदर्शन करतांनी म्हणाले
येणारा काळ हा मोठा भयंकर येणार आहे याचीही समाजाला जाणीव करून दिली व ही मनुवादी व्यवस्था जर संपवायची असेल तर आपणा सर्वांना एक निशाणी एक नेता आणि एक पक्ष निवडावा लागेल तेव्हाच आपल्या समाजाची प्रगती व बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण शासन करती जमात बनण्यात यशस्वी होऊ ..


0 टिप्पण्या