• दिघोरी/मोठी पोलिसांची कारवाई
• ५ लाख ६ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त
चित्रा न्युज ब्युरो
भंडारा :- चुलबंद नदीपात्रातील रेती घाटातून अवैधरित्या रेती तस्करी होत असल्याचे गुप्त माहिती वरून दिघोरी/मोठी पोलिसांनी छापा मारून विना क्रमांकाचा निळ्या रंगाचा सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर ट्रॉली रंगेहात पकडल्याची घटना शनिवार(ता.२१ डिसेंबर) रोजी पहाटे ४:०० वाजता दरम्यान जैतपूर येथे उघडकीस आली. दिघोरी पोलिसांनी चालक/मालकावर गुन्हा दाखल केला असून ५ लाख ६ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींची नावे मालक जयपाल फुलीचंद मुळे(३५), रा जैतपूर, चालक सोनल उर्फ सोनू गिरधारी वालदे(२५), रा खोलमारा/जुना, तालुका लाखांदूर अशी आहेत. या घटनेने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी अवैध धंद्यावर अंकुश लावण्याकरिता सर्वच पोलिस ठाण्यांना आदेश दिले आहेत. दिघोरी/मोठी पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष गद्रे, पोलिस हवालदार हितेश मडावी, पोलिस शिपाई रूपचंद वैद्य, चालक पोलिस शिपाई अमित सातके पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना चुलबंद नदी खोऱ्यातील रेती घाटातून अवैध रेती तस्करी होत असल्याचे गुप्त माहिती वरून जैतपूर येथे छापा मारला असता विना क्रमांकाचा निळ्या रंगाचा सोनालीका डीआय ३५ आरएक्स सिकंदर कंपनीचा ट्रॅक्टर किंमत ४ लाख व विना क्रमांकाची निळ्या रंगाची पासिंग न झालेली ट्रॉली किंमत १ लाख रुपये तसेच ट्रॉली मध्ये भरलेली अंदाजे १ ब्रास रेती किंमत ६ हजार असा एकूण ५ लाख ६ हजार रुपये चा मुद्देमाल चूलबंद नदीपात्रातील रेती ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये अवैधरित्या चोरून पर्यावरणाची हानी करून शासनाचा महसूल बुडवून वाहतूक करतांना मिळून आल्याने पोलिस हवालदार हितेश मडावी यांचे फिर्यादी वरून जयचंद मुळे व सोनल उर्फ सोनू वालदे यांचे विरुद्ध दिघोरी/मोठी पोलिस ठाण्यात अपराध क्रमांक ११९/२०२४ कलम ३०३(२), ३(५) भारतीय न्याय संहिता २०२३, पर्यावरण संवर्धन अधिनियम १९८६ चे सहकलम ७, ९, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ४८(८) तसेच मोटारवाहन कायदा सहकलम ५०/१७७, ३/१८१ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी ट्रॅक्टर चालक व मालकास अटक करण्यात आली असून पोलिस हवालदार उमेश वलके तपास करीत आहेत. या कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
0 टिप्पण्या