चित्रा न्युज ब्युरो
भंडारा :- लाखनी येथील पंचायत समिती सभागृहात दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम, २०१६ अन्वये सोमवार(ता.१६ डिसेंबर) एक दिवसीय जनजागृती कार्यशाळा पार पडली. समान संधी व संपुर्ण सहभाग या धोरणात्मक निकषाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ शासनाच्या या कायद्याची आणि दिव्यांग व्यक्ती करीता पायाभूत सुविधा मिळण्याकरिता विविध कल्याणकारी योजनांची माहीती मिळावी. या उद्देशाने भंडारा जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग आणि दिव्यांग पुनर्वसन केन्द्र भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शक म्हणून दिव्यांग व्यक्ती जिल्हा समन्वयक संजय पुसाम, विस्तार अधिकारी(पंचायत) के. डी. टेंभरे, प्रवीण लांजेवार व आरोग्य विभागातील इतर अधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेला मार्गदर्शन करतांना संजय पुसाम यांनी दिव्यांग हे समाजातील घटक असून २०१६ च्या कायद्याची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी अमलात आणलेल्या योजनाची जनजागृती करून दिव्यांग बांधवा पर्यत पोहचवाव्या असे उपस्थितांना आवाहन केले. आधी अपंगांच्या प्रकारांची संख्या ७ होती.तिच्यात वाढ करून २१ पर्यंत करण्यात आली आहे. केंद्र सरकारला या यादित अधिक प्रकारचे दिव्यांग जोडण्याचा अधिकार असून सध्या यादीमध्ये अंधत्व, कमी दृष्टी, कुष्ठरोग बरे झालेले व्यक्ती, श्रवणदोष(बहिरे आणि ऐकू न येणे), लोकोमोटर अक्षमता, बटूत्व, बौद्धिक अपंगत्व, मानसिक आजार, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, सेरेब्रल पाल्सी, मस्कुलर डिस्ट्रॉफी, क्रॉनिक न्यूरोलॉजिकल स्थिती, विशिष्ट शिकण्याची अक्षमता, मल्टिपल स्क्लेरोसिस, भाषण आणि भाषा अक्षमता, पॅलेसेमिया, हिमोफिलिया, सिकलसेल रोग बहिरा-अंधत्वासह अनेक अपंगत्व, ॲसिड हल्ल्याचे बळी, पार्किन्सन रोग यांचा समावेश करण्यात आला आहे. पंचायत समिती लाखनी येथे दोन सत्रात कार्यशाळा घेण्यात आली असून प्रथम सत्रात आशा ताई, गट प्रर्वतक व अंगनवाडी पर्यवेक्षकाचे प्रशिक्षण घेण्यात आले. व दुसऱ्या सत्रात पंचायत समिती अधिकारी/कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी व केन्द्र प्रमुख, विषय तज्ञ यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. दिव्यांग व्यक्ती अधिकार २०१६ बाबद एक दिवसीय जनजागृती कार्यशाळा निमित्त पंचायत विस्तार अधिकारी के.डी.टेंभरे व प्रवीण लांजेवार यांनी मार्गदर्शन केले.


0 टिप्पण्या