पंकज पाटील नाशिक विभागिय संपादक
अमळनेर :- सध्याचे वातावरण पाहता सर्वत्र स्व ला प्राधान्य देणारे व्यक्तिमत्व आज बाजारपेठेत पाहायला मिळते. जन्माला आलेला प्रत्येक व्यक्तीला मी इतरांपेक्षा वेगळा असून माझ्यासारखा कुणीही नाही. मी,मीच आहे. दुसरे कुणी नाही, अशीच परिस्थिती पाहायला मिळते. त्याला अपवाद म्हणजे अमळनेर शहरात आज ता. 10 डिसेंबर रोजी भागवत एकादशीच्या पूर्वसंध्येला श्रीमद भगवद गीतेचा" प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आलेले उच्च विद्या विभूषित असलेले श्रीकृष्ण भक्त आकाश बागल हे एम. एस.स्सी. (Analytical chemistry ) मुंबई कुशाग्र हुशार बुद्धिमत्ता लाभलेले व्यक्तिमत्व मला आज लाभले. मी अचानक पत्रकारितेच्या माध्यमातून शहरात सायंकाळी फेरफटका मारताना त्यांनी मला हाक देत गीता घेण्यासाठी आग्रह धरला. मी म्हटले माझ्याकडे श्रीमद भगवद गीता आहे. आणि थोढे अंतर पुढे गेल्यावर मला त्यांना भेटावेसे वाटले. मी माझी दुचाकी मागे घेत त्यांना भेटलो आणि पुन्हा नम्रतेने सांगितले माझ्याकडे श्रीमद भगवद गीता आहे हे. त्यांच्याशी चर्चा करताना मला आश्चर्य वाटले. आकाश बागल हे एम. एस. स्सी झाले असून आपले जीवन त्यांनी यापुढे गीता प्रचार आणि प्रसार करण्यासाठीच आहे.
प्रत्येक व्यक्तीला वाटते मी आयुष्यात खुप काही केले. दुसऱ्यासाठी बलिदान दिले. पण उच्च विद्या विभूषित तरुण आपले तारुण्याचे बलिदान देऊन धर्म आणि संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करतो, तेव्हा माझ्या मनात असलेला मी हा अहंकार गळून पडतो. साधा दहावी, बारावी झालेला विद्यार्थी हा परिस्थितीचा बाऊ करीत विविध कारणे देत इतरांना दोष देतात. मात्र इथे आकाश बागल यांना परिस्तिथी आणि उच्च शिक्षण असताना गीतेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी परिवार त्यागून, ब्रह्मचर्य पालन करण्याचा निर्णय घेणे म्हणजे ही एक अदृश्य शक्तीच असू शकते. आपल्याकडे अचानक आलेले पद, पैसा याने आपण इतरांना कमी लेखने,परिस्थितीचा अभिमान दाखवणे ह्या मात्र श्रीकृष्ण भक्त आकाश बागल यांच्या बाबतीत शून्य असून तुमच्याकडे आहे त्या परिस्थितीत तुम्ही आनंदी जीवन जगताना इतरांना आनंद द्या. हाच संदेश त्यांच्या व्यक्तिमत्वात जाणवला. जज पत्रकारितेच्या भाषेत एकच सांगेल इतरांना कमी दाखवून काड्या करणाऱ्यांनो आकाश बागल यांचे इतके मोठे नाही पण माफ करणे तुम्ही आणि मी आपण शिकुया........
जगा आणि जगू द्या
प्रा. हिरालाल पाटील -पत्रकार


0 टिप्पण्या