चित्रा न्युज ब्युरो
नांदेड- :- महापालिकेच्या वतीने आज दि.०६ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ७.३० वाजता *भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर* यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पूर्णकृती पुतळ्यास *मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांनी पुष्पहार अर्पण करुन आदराजंली वाहीली.
यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री गिरीश कदम, उपआयुक्त श्री स. अजितपालसिंग संधु, उपायुक्त श्री संजय जाधव, लेखाधिकारी श्री श्रीनिवास चन्नावार, कार्यकारी अभियंता श्री संघरत्न सोनसळे, शिक्षणधिकारी श्री व्यंकटेश चौधरी, सहा-आयुक्त श्री मिर्झा बेग, श्री रमेश चवरे, रावन सोनसळे, सौ.निलावती डावरे, श्री गौतम कवडे, अग्निशमन अधिकारी श्री के.जी. दासरे, प्रकल्प संचालक श्री अशोक सुर्यवंशी यांच्यासह मनपाचे कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या