चित्रा न्युज ब्युरो
परभणी : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. परभणी शहरात झालेल्या संविधान विटंबनेच्या निषेधार्थ त्यांनी आवाज उठवला होता. तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलिस मारहाणीत झालेल्या मृत्यूमुळे त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते.
परभणी घटनेची माहिती आणि पीडितांना भेटण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आज परभणी दौऱ्यावर होते. त्यावेळी आज दुपारपासून ते अंत्यविधीपर्यंत वाकोडे ॲड. आंबेडकर यांच्यासोबत होते. अंत्यविधी नंतर त्यांना तीव्र हृदय विकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, परभणी जिल्ह्याचा आधार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीतून हळहळ व्यक्त होत आहे.


0 टिप्पण्या