Ticker

6/recent/ticker-posts

परभणीतील भिमसैनिक शहिद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्युस जबाबदार पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले



 रिपब्लिकन पक्षाने केले राज्यभर निषेध आंदोलन


चित्रा न्युज ब्युरो
मुंबई  - परभणीतील संविधान विटंबनेच्या निषेधार्थ आंबेडकरी जनतेने केलेले तीव्र आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी बळाचा अतिरेकी वापर करुन निरपराधांनाही जिवघेणी मारहाण केली आहे.पोलिसी मारहाणीत काही महिला आणि विद्यार्थी गंखीर जखमी आहेत.त्यातील निरपराध विद्यार्थी असणारा तरुण भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी  यांचा कोठडीत मृत्यु झाला असुन जबर मारहानीमुळे त्यांचा मृत्यु झाल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये सत्य उघड झाले आहे.त्यामुळे पोलिस हे रक्षक आहेत कि भक्षक आहेत असा सवाल करित रिपब्लिकन पक्षाने  परभणीतील पोलिसी दडपशाहीच्या निषेधार्थ आज राज्यभर तिव आंदोलन केले आहे.
                       परभणीतील भिम सैनिक शहिद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्युस जबाबदार पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करावी.या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी तातडीने लक्ष देऊन दोषी पोलिसांना नोकरीतुन बडतर्फ करावे.मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करून  जलदगती न्यालयात खटला चालवून दोषी पोलिसांना कठोर शिक्षा करावी.पोलिसांनी कायदा हातात घेऊ नये पोलिसांची प्रतिमा डागाळली जाईल असे पोलिसांनी कृत्य करु नये. ज्या पोलिसांनी निरपराध आंदोलकांवर अतिरेकी मारहान केली आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय  सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली आहे.परभणी आंदोलनातील निरपराध आणि शांततेने आंदोलन करणाऱ्या आंदोलकावरील गुन्हे काढुन टाकावेत . सी.सी.टिव्ही पाहुन निर्दोष व्यक्तींना तात्काळ मुक्त करावे अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली आहे.

                     दिवगंत शहिद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुंटुंबीयांना शासनाने सांत्वनापर  25 लाख निधी द्यावा आणि त्यांच्या कुंटुंबातील एक व्यक्तिला शासकीय नोकरी द्यावी.या आंदोलनात वत्सलाबाई मानवते या महिलेला मारहान करणाऱया पोलिसांवर कठोर कारवाई करावी.वत्सलाबाई मानवते यांना राज्य सरकारने 15 लाखाची मदत करून त्यांचे पुनर्वसन  करावे.संविधान विटंबना आणि त्यानंतरच्या निषेध आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहानीचा आणि कोंबीग ऑपरेशनची  या सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी.परभणी शहरातील सर्व पोलिस स्टेशनचे सी.सी.टिव्ही तपासावे.न्यायालयीन कोठडीत असलेल्या आंदोलकांची वैद्यकीय तपासणी करावी.या मागण्यासाठी  तसेच संविधानाच्या सन्मानासाठी; संविधानाची विटंबना करणाऱ्यांचा निषेधासाठी आणि दिवंगत शहीद भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज संपूर्ण राज्यभर रिपब्लिकन पक्षाने तीव निषेध आंदोलन केले.

                          सोलापुर शहरात रिपाइं महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या नेतृत्वात परभणी प्रकरणी तीव निषेध आंदोलन करण्यात आले.सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यु प्रकरणी दोषी पोलिसावर 
कठोर कारवाई ची मागणी या निषेध आंदोलनात राजाभाऊ सरवदे यांनी केली.

            मुंबईत रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश सिध्दार्थ कासारे यांच्या नेतृत्वात  विविध ठिकाणी आंदोलन झाले.मुलुंड येथे रिपाइंचे अजित रणदिवे,योगेश शिलवंत,राजु साळवे यांच्या नेतृत्वात आंदोलन करुन परभणीतल्या संविधान विटंबनेचा निषेध आणि पोलिसी दडपशाहीचा निषेध करण्यात आला.उत्तर मुंबईचे जिल्हा अध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या नेतृत्त्वात दहिसर  येथे ,चेंबुर मध्ये रवी गायकवाड,घाटकोपर मध्ये राजाभाऊ गांगुर्डे,बांद्रा येथे अमित तांबे यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन क्करण्यात आले.संपूर्ण मुंबई,ठाणे,पुणे,नाशिक सह संपूर्ण राज्यात रिपब्लिकन पक्षाने तीव आंदोलन करुन पोलिसांनी केलेल्या अत्याचाराचा तीव निषेध केल्याची माहीती रिपाइं चे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस गौतम सोनावणे यांनी दिली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या