Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामस्वच्छ करून साजरी केली राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी


चित्रा न्युज ब्युरो
भंंडारा :  ग्रामस्वच्छता अभियान साजरा   दिनांक 20 डिसेंबरला राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी विद्यालयात साजरी करून  परिसरातील उमरी या गावी तसेच चिखली या गावी जाऊन तथागत विद्यालय केसलवाडा येथील विद्यार्थ्यांनी ग्राम स्वच्छता केली.
 यासाठी उमरी गावचे सरपंच सौ.शशिकलाताई शिवणकर उपसरपंच श्री. भोयर तसेच गावकऱ्यांनी सहकार्य केले आणि मुलांनी संपूर्ण गाडगे महाराज यांच्या पुतळ्या सभोवतालचा परिसर स्वच्छ केला तसेच चिखली या गावी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते गाव समोरील  परिसर विद्यार्थ्यांनी झाडून, मंदिर साफ करून साजरा केला आणि एक मोलाचा संदेश समाजात दिला.
यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पद्माकर सावरकर,श्री. अविन दिघोरे, श्री. प्रदीप गोंडाने, श्री. प्रमोद गाडेकर श्री. रोहित फेंडर सर इत्यादींचे सहकार्य लाभले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या