पंकज पाटील नाशिक विभागिय संपादक
अमळनेर :- साने गुरुजी अमळनेर येथे प्रताप हायस्कूलमध्ये 1924 ला शिक्षक म्हणून रुजू झाले होते.त्या घटनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत . दि 24 डिसेंबर 2024 रोजी साने गुरुजी जयंती निमित्त शंभर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 4 वाजता, धनदाई महाविद्यालयाच्या, यशवंत हॉलमध्ये वक्त्यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी प्रा. अशोक पवार यांनी साने गुरुजीं विषयी तयार केलेले वाचन साहित्य देण्यात येणार आहे .कार्यशाळेत प्रा. डॉ.लीलाधर पाटील ,शिवव्याख्याते रामेश्वर भदाणे, गौतम मोरे, देवेंद्र पाटील यांचे साने गुरुजीं जीवन कार्याविषयी मार्गदर्शन लाभणार आहे. तरी सर्व राष्ट्रीय प्रबोधन विचार अभियानातील सर्व वक्त्यांनी कार्यशाळेस वेळेवर उपस्थित रहावे ही विनंती.
संपर्क-- प्रा. अशोक पवार
9422278256
युवा कल्याण प्रतिष्ठान,अमळनेर
0 टिप्पण्या