Ticker

6/recent/ticker-posts

प्रत्येक यशस्वी पुरूषामागे स्ञी असते यांचे उत्तमउदाहरण समजूतदार पत्नी मिळाली तर तुम्ही या जगातील सर्वात भाग्यवान आणि श्रीमंत व्यक्ती आहात. असे सचिन तेडूंलकरांनी सांगीतले.


पंकज पाटील नाशिक विभागिय संपादक 

मूंबई :- असं म्हणतात की जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात समजूतदार पत्नी मिळाली तर तुम्ही या जगातील सर्वात भाग्यवान आणि श्रीमंत व्यक्ती आहात. 

सचिनच्या आयुष्यात अंजली मेहता होती, सचिनने आपली संपूर्ण कारकीर्द खेळून काढली, सचिनवर आलेल्या सर्व जबाबदाऱ्या अंजलीने एकहाती उचलल्या. यासाठी अंजलीने केवळ तिची वैयक्तिक कारकीर्दच पणाला लावली नाही तर सचिनला करिअर घडवण्यात मदत केली. 

सचिन इतका लाजाळू होता की तो त्याच्या लग्नाबद्दल आई-वडिलांशी बोलूही शकत नव्हता, अंजलीनेच हे काम केले. पण सचिनचे बंधुप्रेम इतके होते की त्याने एक गोष्ट अंजलीला आधीच क्लियर सांगितली की, तू माझ्या कुटुंबात येण्याआधी अजित भाईंची संमती खूप महत्त्वाची आहे.. त्यांच्या संमतीशिवाय आपलं नातं शक्य नाही.

सचिनने पहिल्यांदा त्याच्या मोठ्या भावाशी अंजलीची ओळख करून दिली. अजित हो म्हणाला त्यानंतरच अंजलीशी त्याचे बोलणे वाढले. सचिनचे म्हणणे आहे की, त्याने कधीही कोणत्याही मुलीला डेट केले नाही.  कारण क्रिकेट आयुष्यात इतके लवकर आले की तारुण्य त्यातच गेले… आणि अंजलीही योग्य वेळी आली.

सचिनचे डेटींग सुद्धा अशा पद्धतीने चालली होती की बाहेरच्या जगाला काही कळले नाही, बरेच दिवस त्याच्या घरच्यांनाही माहित नव्हते. असं नव्हतं की अंजली सचिनच्या ग्लॅमर मागे वेडी होती, अंजलीला क्रिकेट मुळात आवडत नव्हते आणि त्यावेळी ती सचिनच्या दर्जापेक्षा हजार पटीने वर होती. तिचे त्याचे वडील ब्रिजचे राष्ट्रीय विजेते होते. 

पण पुढे काय होणार आहे याची त्यांना नक्कीच जाणीव होती... एक सोळा-सतरा वर्षांचा मुलगा ज्याच्याबद्दल वर्तमानपत्रात बातम्या येत होत्या, ज्याच्याबद्दल लोक बोलू लागले होते.

घरच्यांना संशय आल्यावर सचिनने एकदा अंजलीला घरी बोलावले पण ती रिपोर्टर म्हणून आली होती.  काही दिवसांनी सचिनने मोठ्या भावाला अंजलीची माहिती दिली. पाच वर्षे डेट केल्यानंतर सचिनने अंजलीसोबत तिच्या २१व्या वाढदिवशी लग्न केले.  आणि नंतर ती त्याची बेटर हाफ बनली.  सचिन म्हणतो, आई-वडिलांची जबाबदारी म्हणजे काय असते हे मला माहीतच नव्हते. सारा आणि अर्जुनचे पालनपोषण तिनेच केले.

सचिन म्हणतो, एकदा सहज जाणवलं की माझा अर्जुन आता माझ्यापेक्षा उंच झालाय. मी माझ्या आयुष्यात इतकं काही मिळवू शकलो ते अंजलींमुळेच, आज मी सचिन आहे अंजलींमुळे.

सार्वजनिक जीवन म्हणजे काय? समुद्रकिनाऱ्यावर बसून नारळपाणी पिण्यात काय मजा असते आणि बायकोसोबत पाणीपुरी खाण्यात काय मजा असते, हे सर्व अंजलीने माझ्यासाठी त्याग केले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या