Ticker

6/recent/ticker-posts

वैशाली व सुबोध बुद्ध विहारात महापरिनिर्वाण दिन साजरा

चित्रा न्युज ब्युरो
भंडारा :- अड्याळ येथील वैशाली बुध्द विहार आणि  सुबोध बुध्द येथे शुक्रवार(ता.६ डिसेंबर) रोजी विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश मेश्राम, प्रमुख अतिथी ठाणेदार धनंजय पाटील, सरपंच शिवशंकर मुंगाटे, ग्रामविकास अधिकारी हिरालाल खंडाईत, पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, तंमूस अध्यक्ष नरेंद्र अंबादे, माजी तंमुस अध्यक्ष नितीन वरगंटीवार, ग्रामपंचायत सदस्य अशिक अंबादे, सदस्या वसुश्री टेंभूर्णे, माजी ग्रामपंचायत सदस्या वर्षा रामटेके, कृतिका डोंगरे, डॉ.शीला मेश्राम, विकास टेंभूर्णे, देवाजी जांभूळकर, अर्जुन जनबंधू, निर्भय साखरे, जगदीश रामटेके यांचे प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. सर्व प्रथम विहारातील बुध्दमुर्तीला ठाणेदार धनंजय पाटील, सरपंच शिवशंकर मुंगाटे व मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन, माल्यार्पण करण्यात आले. नंतर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. डॉ. गणेश मेश्राम यांनी धम्म ध्वजाचे आरोहन केले. उपस्थित मान्यवरांनी महापरिनिर्वान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्र, कार्यावर मोलाचे मार्गदर्शन केले. महिलांनी श्रद्धांजलीपर भिमगित सादर केले. उपस्थितांनी बाबासाहेबाना आदरांजली वाहिली व सामुहिक बुध्दवंदना घेण्यात आली. बाजूलाच असलेल्या सुबोध बुद्ध विहारात मान्यवरांनी दीप प्रज्वलन व माल्यार्पण केले. ग्रामविकास अधिकारी हिरालाल खंडाईत यांनी धम्म ध्वजाचे अवरोहान केले. कार्यक्रमाचे संचालन वैशाली बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष तथा माजी सरपंच मुनीश्वर बोदलकर यांनी तर आभार विकास टेंभूर्णे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वॉर्डातील सर्व बुद्ध उपासक, उपासिका यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या