चित्रा न्युज ब्युरो
भंडारा :- मंडई निमित्त न्यू युवा सांस्कृतिक मंडळ खैरी/पिंपळगाव(सडक) चे वतीने मंगळवार(ता.१० डिसेंबर) रोजी रात्री ठीक ८:३० वाजता प्रसिद्ध सप्तखंजरी वादक सत्यपाल महाराज यांच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाचे ग्रामपंचायत समोरील भव्य पटांगणावर आयोजन करण्यात आले आहे. उदघाटक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, अध्यक्षस्थानी खासदार प्रशांत पडोळे, मुख्य अतिथी तहसीलदार धनंजय देशमुख, पोलिस निरीक्षक हृदयनारायण यादव, सेवानिवृत्त उत्पादन शुल्क अधिकारी महम्मद मतीन इरशाद शेख, प्रमुख अतिथी माजी आमदार बाळा काशीवार, सेवक वाघाये, वैनगंगा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सोमदत्त करंजेकर, जि.प. सदस्या डॉ. मनीषा निंबार्ते, पंचायत समिती सदस्य किशोर मडावी, माजी जि.प. सदस्य आकाश कोरे, भाजपा तालुकाध्यक्ष श्रावण कापगते, माजी पंचायत समिती सदस्य पंकज श्यामकुवर, प्रमुख उपस्थिती पिंपळगाव चे सरपंच श्याम शिवणकर, रेंगेपार चे सरपंच मनोहर बोरकर, सामेवाडा च्या सरपंच शालिनी गजभिये, बाम्हणी चे सरपंच मुकेश मेनपाले, चीचगावच्या सरपंच लता रामटेके, मुंडीपार च्या सरपंच मनोरमा हुमने, सोसायटी अध्यक्ष केवळराम वाडीभस्मे, परमपूज्य परमात्मा मार्गदर्शक रवींद्र मसराम, मुख उपस्थिती खैरी च्या सरपंच ललिता कोरे, उपसरपंच नूतन झिंगरे, ग्रामसेवक सी.जी. भानारकर, पोलिस पाटील प्रफुल्ल चौधरी, अध्यापक ईश्वर जांभूळकर, ग्रामपंचायत सदस्य अमन निर्वाण, प्रशांत मेश्राम, सदस्या नम्रता नवखरे, कविता गिरेपुंजे, सुरेखा दोनोडे, संगणक परिचालक प्रवीण नेवारे, तंमुस अध्यक्ष लालदास निर्वाण, ग्रामपंचायत शिपाई ज्ञानेश्वर फाये, रोजगार सेवक अरुण गायधने, अंगणवाडी सेविका एकादशी धरमसहारे, आशा सेविका प्रमिला निर्वाण, आय.सी.आर.पी. कांचन गायधने, कृषी सखी वनिता झिंगरे, पशू सखी माधुरी नवखरे, माजी सरपंच पुरुषोत्तम रोकडे, दशरथ मेश्राम आणि मान्यवरांचे प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. या समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घेण्याचे आवाहन न्यू युवा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष संतोष निर्वान, उपाध्यक्ष पवन मेश्राम, सचिव बसूराज गभने, स्वप्नील फाये, आदित्य मेश्राम, सहसचिव राकेश निर्वाण, लौकिक रोकडे, रमण निर्वाण, कोषाध्यक्ष सुबोध वाडीभस्मे, भूपेश झिंगरे, पवन रोकडे, विपुल मेश्राम, स्टेज मॅनेजर राजेश मस्के, पियूष राऊत, रोहित चौधरी तेजस निर्वाण आणि सदस्यांनी केले आहे.


0 टिप्पण्या