जि. प. प्रवेशद्वारावर बक्षीस योजनेचा बोर्ड
गणेश शिंदे नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक : जिल्हा परिषदेत बहुचर्चेत असलेल्या मालेगाव तालुक्यातील टोकडे येथील रस्ताचोरी प्रकरण संपण्याचे नाव घेत नाही. प्रशासकीय पातळीवर सर्वत्र तक्रार केल्यानंतर तक्रारदार विठोबा द्यानद्यान यांनी सोमवारी (दि. २३) रस्ता शोधून देणाऱ्यास जाहीर केलेल्या बक्षिसाच्या रकमेत वाढ करत तसा फलक जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर झळकावला. याकडे प्रशासनासह अभ्यागतांचे लक्ष वेधून घेतले.टोकडे येथील १८ लाखांचा रस्ता कागदोपत्री दाखविण्यात आल्याची तक्रार द्यानद्यान यांनी केली आहे. या कामाची पाच वेळा जिल्हा परिषद प्रशासनाकडून चौकशी करण्यात Repलो. अहवालात गावाचा बाहेरील रस्ता दाखविण्यात येत आहे. मात्र, गावांतर्गत रस्ता असल्याने द्यानद्यान यांनी त्यांची तक्रार कायम ठेवली आहे. इतकेच नव्हे, तर चोरीला गेलेला रस्ता शोधून देणाऱ्यास प्रारंभी एक लाखाचे व नंतर पाच लाखांचे बक्षीसही जाहीर केले. त्यामुळे हे प्रकरण राज्यात चर्चिले जात आहे. नुकतेच हे प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गेले आहे.याप्रकरणी न्याय मिळत नसल्याचे बघून द्यानद्यान यांनी जिल्हा परिषदेच्या भिंतींना लागलेल्या इतर फलकांप्रमाणे बक्षीस योजनेचा फलक लावण्यासाठी प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. मात्र, त्यांना परवानगी नाकारण्यात आल्याने सोमवारी त्यांनी चोरी गेलेली कामे शोधून देणाऱ्यांसाठी बक्षीस योजनेचा फलक जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर झळकावून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्म केला. याप्रसंगी माहिती सेवा समितीचे अध्यक्ष राजेंद्र नानकर, प्रशांत देशमुख, बाबा लोखंडे, संदीप देवरे उपस्थित होते.


0 टिप्पण्या