रिसोड तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली
देशातील सर्वात मोठी पत्रकारांची संघटनेच्या रिसोड तालुका कार्यकारिणीची आढावा सभा
चित्रा न्युज ब्युरो
रिसोड :-दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी व्हॉईस ऑफ मीडिया तालुका कार्यालयात करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संतोषभाऊ चराटे राज्य संघटक,तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये विवेकानंद ठाकरे राज्य कार्यकारणी सदस्य,अर्जुन पाटील खरात राज्य कार्यकारणी सदस्य,वाशिम जिल्हा अध्यक्ष श्री. भागवत मापारी, ज्येष्ठ मार्गदर्शक श्री.ताराचंद वर्मा,वसंतराव खडसे जिल्हाध्यक्ष डिजिटल विंग,
शेख अन्सार जिल्हा कार्य.सदस्य,
यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका कार्यकारिणी चे पुनर्गठण करण्यात आले.यावेळी मागील दोन वर्षापासून व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष म्हणून यशस्वीरीत्या पार पडलेले विनोद पाटील बोडखे यांची
तालुका अध्यक्ष म्हणून एक मताने निवड करण्यात आली.तर तालुका उपाध्यक्ष म्हणून महादेव घुगे,तालुका सचिव रुपेश पाटील,तालुका कार्याध्यक्ष दीपक पाटील शेवाळे, प्रसिध्दी प्रमुख सुरेश गिरी,तालुका सहसचिव शंकर सदार,कोषाध्यक्ष महेंद्र महाजन,सह कोषाध्यक्ष अनिकेत खरात,संघटक नाजिम खान,
सहसंघटक राम वानखेडे,नरेंद्र अंभोरे , तर तालुका कार्यकारणी सदस्य म्हणून प्रभाकर नाईकवाडे,गणेश कवडे, अजय जाधव,महेश गिरी, यांची निवड करण्यात आली.यावेळी सर्वांनुमाते तालुका अध्यक्ष विनोद पाटील बोडखे तसेच नवनियुक्त तालुका कार्यकारिणी पदाधिकारी,सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रतिक्रिया
व्हॉईस ऑफ मीडिया देशातीलच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर पत्रकारांसाठी काम करणारी सर्वात मोठी संघटना असून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संडीपजी काळे,प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के,राज्य संघटक संतोषभाऊ चराटे,यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. रिसोड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी पुनश्च एकदा माझ्यावर तालुका अध्यक्ष म्हणून जी जबाबदारी टाकली ती प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी बांधील आहे.संघटना वाढीसाठी प्रयत्न करेल.
विनोद पाटील बोडखे तालुका अध्यक्ष व्हॉईस ऑफ मीडिया रिसोड
0 टिप्पण्या